शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

फोनटॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना पुन्हा बजावले समन्स, 3 मे रोजी हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:10 IST

Phone Tapping Case : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या स्थितीत येणे अशक्य असल्याचे त्यांनी सायबर पोलिसांना कळविले होते.

ठळक मुद्देपुन्हा मुंबई पोलिसांनी समन्स धाडले असून ३ मे रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

आयपीएस बदल्यांच्या कथित रॅकेट प्रकरणाचा गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांच्या चौकशीसाठी मुंबईला हजर राहण्यास केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अप्पर महासंचालक रश्मी शुक्ला यांनी असमर्थता दर्शविली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत हैदराबाद येथील कार्यालय सोडू शकत नाही. त्यामुळे माझ्याकडे करायच्या चौकशीबद्दल प्रश्नावली पाठवावी, असे त्यांनी तपास अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईपोलिसांनी समन्स धाडले असून ३ मे रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

बीकेसीमधील सायबर पोलिसांनी २६ मार्चला ऑफिशियल सिक्रेट ॲक्टअंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल गुन्ह्याप्रकरणी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त शुक्ला यांना चौकशीला हजर राहण्यासाठी सोमवारी समन्स बजाविले होते. बुधवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या यशोधन निवासस्थानी हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या स्थितीत येणे अशक्य असल्याचे त्यांनी सायबर पोलिसांना कळविले होते.

मात्र, त्यांनी याप्रकरणी तपासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन संबंधित गुन्ह्याची एफआयआर प्रत आणि प्रश्नावली पाठवावी, त्याबाबत तातडीने माहिती देईन, असेही शुक्ला यांनी सांगितले होते. शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख म्हणून कार्यरत असताना गेल्या वर्षी २५ ऑगस्टला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटबद्दल काही व्यक्तींचे फोन टॅप करून अहवाल बनविला होता. तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दुसऱ्या दिवशी ताे गृहविभागाकडे सादर केला. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे तसेच शुक्ला यांनी शासनाची फसवणूक व अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवून अहवाल फेटाळण्यात आला होता. या प्रकाराबद्दल शुक्ला यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने कारवाई टळली होती. मात्र तोच गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या २३ मार्चला उघड करून राज्य सरकारवर आरोप केले.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाMumbaiमुंबईPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम