ज्याने बलात्कार केला तोच लग्न करून बनला पती, जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 11:11 IST2022-12-29T11:10:47+5:302022-12-29T11:11:50+5:30

Pakistan Crime News : रिपोर्टनुसार, तरूणी दिव्यांग आहे. ती ऐकू शकत नाही. याचाच फायदा आरोपीने उचलला आणि एक दिवस तिच्यासोबत अत्याचार केला. तरूणी रडत-ओरडत होती, पण त्याने काही ऐकलं नाही.

Rapist married with rape survivor in Pakistan gets acquittal | ज्याने बलात्कार केला तोच लग्न करून बनला पती, जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्तता

ज्याने बलात्कार केला तोच लग्न करून बनला पती, जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्तता

Pakistan Crime News : एका रेप पीडितेसोबत यापेक्षा जास्त वाईट काय होऊ शकतं की, ज्याने तिच्यावर बलात्कार केला त्याच्याच सोबत तिचं लग्न लावून दिलं. पाकिस्तानात रेपसाठी ज्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती, तोच आरोपी आता तरूणीचा पती बनला.

रिपोर्टनुसार, तरूणी दिव्यांग आहे. ती ऐकू शकत नाही. याचाच फायदा आरोपीने उचलला आणि एक दिवस तिच्यासोबत अत्याचार केला. तरूणी रडत-ओरडत होती, पण त्याने काही ऐकलं नाही. तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याला शिक्षाही सुनावण्यात आली.

कोर्टात रेपची केस सुरू होती आणि दुसरीकडे समोर आलं की,पीडित तरूणी रेपनंतर गर्भवती झाली. नंतर तिने एका बाळाला जन्मही दिला. बाळाच्या जन्मानंतर जेव्हा टेस्ट करण्यात आली तर आरोपीच त्याचा वडील निघाला. अशातच आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 

आरोपीला जेव्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्याने अशी खेळी केली की, तो तुरूंगात बाहेर आला. लोकल परिषदेने दोन्ही परिवारांमध्ये करार करून दिला. यावेळी हे ठरलं की, आरोपी पीडितेसोबत लग्न करेल आणि त्या बदल्यात पीडित परिवाराने केस मागे घ्यावी. या कराराची माहिती कोर्टाला देण्यात आली आणि आरोपी तुरूंगातून सुटला. 

Web Title: Rapist married with rape survivor in Pakistan gets acquittal