अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा दिल्लीतून जेरबंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 03:10 IST2019-05-07T03:09:55+5:302019-05-07T03:10:16+5:30

गावातून कामानिमित्त घरी राहायला आलेला आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पैसे आणि दागिन्यांसह पळ काढणारा आरोपी तीन वर्षांनी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला.

rapist arrest from Delhi | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा दिल्लीतून जेरबंद  

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा दिल्लीतून जेरबंद  

मुंबई : गावातून कामानिमित्त घरी राहायला आलेला आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पैसे आणि दागिन्यांसह पळ काढणारा आरोपी तीन वर्षांनी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. निसार शमशाद खान (२७) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिल्लीतून ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, खान हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो कामानिमित्त मुंबईत आला. गावच्या ओळखीतून घाटकोपरमध्ये राहात असलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला आधार दिला. मात्र त्याची घरातील अल्पवयीन मुलीवर वाईट नजर पडली. २०१५ मध्ये त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. १० मार्च २०१६ रोजी घरातील ४० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून तो पसार झाला. घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी लैंगिक अत्याचारासह चोरी, मारहाण, अश्लील शिवीगाळ पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढे या गुन्ह्याचा गुन्हे शाखेचे कक्ष ७चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासात तीन वर्षांनंतर गुन्हे शाखेला तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. तो दिल्लीतील एका बँकेमध्ये क्रेडिट कार्ड आणि कर्ज विभागात नोकरी करीत असल्याचे समजताच त्यांनी तेथून त्याला अटक केली.

Web Title: rapist arrest from Delhi