शिक्षिकेवर बलात्कार करून विवस्त्र फोटो काढले; निवृत्त ACP असल्याचा दावा करत लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:38 IST2021-09-11T15:36:34+5:302021-09-11T15:38:08+5:30
पीडित महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विकास अवस्ती (रा. पिंपळे गुरव), असे आरोपीचे नाव आहे.

शिक्षिकेवर बलात्कार करून विवस्त्र फोटो काढले; निवृत्त ACP असल्याचा दावा करत लैंगिक अत्याचार
पिंपरी : दरमहा १० टक्के व्याजाने पैसे देतो, असे सांगून शिक्षिकेवर बलात्कार केला. तसेच विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून पैसे दिले नाहीत. मी रिटायर एसीपी आहे, तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळे गुरव येथे डिसेंबर २०१९ ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
पीडित महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विकास अवस्ती (रा. पिंपळे गुरव), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला शिक्षिका म्हणून नोकरी करीत असताना त्यांना पैशांची अडचण होती. त्यामुळे त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्ती याच्याकडे पैशांची मागणी केली. दरमहा १० टक्के व्याजाने पैसे देतो, असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेकडून दोन कोऱ्या धनादेशांवर व कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर फिर्यादीला शितपेय देऊन जबरस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून घेऊन फिर्यादीला पैसे दिले नाहीत.
आरोपी हा फिर्यादीच्या कामाच्या ठिकाणी गेला. तू जर नाही आली तर विवस्त्र अवस्थेतील फोटो स्कूलमध्ये व तुझ्या घरच्यांना दाखवून तुझी बदनामी करतो, अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीला दुचाकीवरून बसवून घेऊन गेला. फिर्यादीने प्रतिकार केला. तू जर ओरडलीस तर , तू जर कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेल, मी रिटायर एसीपी आहे, माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देऊन आरोपीने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
मुंबई बलात्कार प्रकरण: आता पुढे काय करता येईल? फडणवीसांनी CM ठाकरेंना दिला महत्त्वाचा सल्ला...