तरुणीवर बलात्कार करुन नग्नावस्थेतच फेकले; पाटना रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 09:12 IST2021-11-07T09:10:24+5:302021-11-07T09:12:06+5:30

पाटणा : राजधानी पाटणामध्ये एका तरुणीवर किमान एक डझन पुरुषांनी बलात्कार करून तिला नग्नावस्थेतच रस्त्याच्या कडेला फेकून दिले. शनिवारी ...

Rape of a young woman; Thrown naked | तरुणीवर बलात्कार करुन नग्नावस्थेतच फेकले; पाटना रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना

तरुणीवर बलात्कार करुन नग्नावस्थेतच फेकले; पाटना रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना

पाटणा : राजधानी पाटणामध्ये एका तरुणीवर किमान एक डझन पुरुषांनी बलात्कार करून तिला नग्नावस्थेतच रस्त्याच्या कडेला फेकून दिले. शनिवारी सकाळी तिला या स्थितीत पाहून लोकांनी  तिच्यावर काही कपडे टाकून पोलिसांना पाचारण केले. ही तरुणी मूळची ओडिशाची आहे. ती रेल्वेने कानपूरला चालली असता जंक्शनवर पाणी घेण्यासाठी उतरली. पाणी भरून गाडीकडे पोहाेचेतोवर गाडी सुटल्याने ती तेथील बाकड्यावर बसली.

एकटीला पाहून एक जण तिच्पापाशी आला आणि काही मदत हवी का, असे विचारू लागला. त्यावेळी तिने झाला प्रकार सांगितला. त्यावर पुढील ट्रेनमध्ये तुला बसवून देतो, असे त्याने तिला सांगितले आणि शीतपेय प्यायला दिले. ते पिताच ती बेशुद्ध पडली. आज सकाळी रुग्णालयातच ती शुद्धीवर आली. तिने वरील माहिती दिली. मोबाइल व कपड्यांत ठेवलेले तीन हजार रुपयेही गायब झाल्याचे तिने सांगितले. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे. हा युवक एका महाविद्यालयात लपून बसला होता, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Rape of a young woman; Thrown naked