विलगीकरण कक्षात महिलेवर बलात्कार, पनवेलमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 06:22 IST2020-07-18T06:21:16+5:302020-07-18T06:22:09+5:30
कोन गावात इंडिया बुल्स येथे कोविड केअरमध्ये पनवेल परिसरातील एका इसमाला चार दिवसांपूर्वी दाखल केले होते.

विलगीकरण कक्षात महिलेवर बलात्कार, पनवेलमधील घटना
पनवेल : येथील विलगीकरण कक्षात एका ४० वर्षीय महिलेवर डॉक्टर असल्याचे सांगून बलात्कार केल्याची घटना १६ जुलै रोजी सायंकाळी घडली आहे. आरोपीवर तालुका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
कोन गावात इंडिया बुल्स येथे कोविड केअरमध्ये पनवेल परिसरातील एका इसमाला चार दिवसांपूर्वी दाखल केले होते. या इसमाचा भाऊ जेवणाचा डबा घेऊन येत असे. त्यांच्या रूमच्या बाजूलाच खारघर परिसरातील एका चाळीस वर्षीय महिलाही दाखल होती. डबा देणाऱ्या त्या इसमाने त्या महिलेशी ओळख करून घेतली होती.
दरम्यान, त्यालाही लक्षणे जाणवल्याने तिथेच दाखल केले होते. गुरुवारी संध्याकाळी तो त्या महिलेच्या रुममध्ये गेला. आपण डॉक्टर असल्याचे सांगून काही समस्या आहेत का, असे विचारले. महिलेने अंग दुखत असल्याचे सांगताच मसाज करावा लागेल, असे सांगून त्याने महिलेला विवस्त्र केले व तिच्यावर अत्याचार केला.