महाराष्ट्रात चाललंय काय? अमरावतीत बलात्कार पीडितेची आत्महत्या; ७ महिन्यांची होती गर्भवती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:56 IST2021-09-11T15:53:09+5:302021-09-11T15:56:05+5:30
अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार जबरदस्तीनं ठेवले शारीरिक संबंध; पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल;

महाराष्ट्रात चाललंय काय? अमरावतीत बलात्कार पीडितेची आत्महत्या; ७ महिन्यांची होती गर्भवती
अमरावती: मुंबईतल्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार झाला. या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असताना बलात्काराची आणखी एक घटवा समोर आली. अमरावतीमधल्या दर्यापूर एका अल्पवयीन बलात्कार पीडितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायब बाब म्हणजे पीडिता ७ महिन्यांची गर्भवती होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
अमरावतीच्या दर्यापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर नराधमानं बलात्कार केला. ही मुलगी १७ वर्षांची होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. येवदा पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
शिक्षिकेवर बलात्कार करून विवस्त्र फोटो काढले; निवृत्त ACP असल्याचा दावा करत लैंगिक अत्याचार
पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसह दर्यापूरमध्ये वास्तव्यास होती. एका तरुणानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. याची कल्पना मुलीच्या कुटुंबीयांना नव्हती. मुलीच्या आत्महत्यानंतर शवविच्छेदनातून ही बाब उघडकीस आली. बदनामीच्या भीतीपोटी मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरोपी अटकेत, गुन्हा दाखल
आरोपी तरुणानं मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यातून तरुणी गर्भवती राहिली आणि तिनं गळफास लावून आत्महत्या केली. आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.