लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 03:04 IST2020-05-15T03:04:04+5:302020-05-15T03:04:13+5:30

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने बुधवारी तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

rape by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

नालासोपारा : विरार पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने बुधवारी तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सुनील वाडकर (४४) याचा घटस्फोट झाला आहे. २०१५ पासून ते आतापर्यंत त्याने विरार पूर्वेकडील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केले. मात्र, संबंधित तरुणीसोबत वाद झाल्यानंतर त्याने तिला मारहाण केली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने आरोपीविरोधात बुधवारी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: rape by showing the lure of marriage