शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तरुणीवर अनेकवेळा बलात्कार केला, बळजबरीने लग्न केले, मग क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 21:44 IST

Rape Case : तेथे मित्राच्या खोलीत नेऊन अत्याचार केला. यादरम्यान एक अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला. याबाबत धमकावून अनेकवेळा अत्याचार केले. पीडितेने कोटा येथे जाऊन कोचिंग सुरू केले. तेथेही आरोपी धमकावून अत्याचार करायचे.

बारां : पीडितेच्या तक्रारीवरून बारां येथील महिला पोलीस ठाण्यात १९ जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार, ओलीस ठेवणे, जबरदस्ती विवाह, कलम ३७६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.महिला पोलिस ठाण्याचे सीआय लच्छिराम यांनी सांगितले की, पीडितेने बारां येथे स्पर्धेच्या तयारीदरम्यान खासगी संस्थेचे शिक्षक शाहिद हुसेन तिला पेपर घेण्यासाठी अकलेरा येथे घेऊन गेले होते, असे तक्रारीत नमूद आहे. तेथे मित्राच्या खोलीत नेऊन अत्याचार केला. यादरम्यान एक अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला. याबाबत धमकावून अनेकवेळा अत्याचार केले. पीडितेने कोटा येथे जाऊन कोचिंग सुरू केले. तेथेही आरोपी धमकावून अत्याचार करायचे.यादरम्यान आरोपीने पीडितेला धमकावून जबरदस्तीने लग्न केले. काही महिन्यांपूर्वी आरोपीने पीडितेला बारांच्या घरी आणले. जिथे आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडितेला धमकावले आणि खोलीत कोंडून ठेवले. पीडित तरुणी आरोपींच्या तावडीतून निसटली. याबाबत नातेवाईकांना माहिती दिली. पोलिसांनी शाहिद हुसेनसह १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.१९ जणांवर गुन्हा दाखलकल्याण माल मीना, पोलीस अधीक्षक, बारां यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी पीडितेच्या हरवल्याची नोंद करण्यात आली होती.

 

 

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसRajasthanराजस्थान