शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

महिला पोलीस अधिकाऱ्यावरच बलात्कार; माजी BJP नेत्यासह १२ जणांवर FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 20:36 IST

Rape Case : महिला पीएसआयच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

भीलवाडा - राजस्थानमधील भिलवाडा शहरातील प्रताप नगर पोलीस ठाण्यात एका महिला उपनिरीक्षकाने भाजपाचे माजी नेते भंवर सिंह पलाडा यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिला पीएसआयने तिच्या अहवालात नागौरचे एएसपी संजय गुप्ता यांच्याकडे पलाडासह १२ जणांची नावे दिली आहेत. महिला पीएसआयचे म्हणणे आहे की, भंवर सिंग पलाडा याने 2018 ते 2021 या कालावधीत तिच्या भीलवाडा पोलिस लाईनमध्ये असलेल्या क्वार्टरमध्ये लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. ज्याचे पुरावे महिलेकडे आहेत. महिला पीएसआयच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्याचवेळी पीडितेने झी मीडियाला स्पष्टीकरण पत्रही सादर केले असून, याप्रकरणी कारवाई नको असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पोलीस अधिकाऱ्याने पोलीस अधीक्षकांना अहवाल दिला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याने अहवालात सांगितले की, नागौरमध्ये पोस्टिंग दरम्यान, तिने तिच्या ओळखीचे एएसपी संजय गुप्ता यांना विनंती केली की, मॅडम यांना सांगून आयजीपी कार्यालयात बसवण्यास द्यावे, जेणेकरून मी माझ्या आजारी वडिलांची वेळेवर काळजी घेऊ शकेन. संजय गुप्ता सरांनी भंवरसिंग पलाडा यांचा नंबर फिर्यादीला दिला आणि तुम्ही त्याच्याशी बोला तो करून देतील, असे सांगितले. महिला पोलीस अधिकाऱ्याने आपण त्यांना ओळखत नसल्याचे सांगत त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, महिला पोलीस अधिकाऱ्याची नागौरहून भिलवाडा येथे बदली होऊन ती तिच्या घरी आली होती.

या वृत्तात म्हटले आहे की, या वेळी संध्याकाळ जवळजवळ अंधारलेली असावी, तेव्हा भंवर सिंग पलाडा यांचा फोन आला की, मी मसुदा येथे आहे. तू ये! यावर महिला पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ती रात्री एकटी कुठेही जात नाही. जून 2018 पासून भंवर सिंग पलाडा यांनी फोन आणि व्हॉट्सअॅपवर दररोज गुड मॉर्निंग मेसेज सुरू केले. 2018 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, गुरुवार, 13 डिसेंबर 2018 रोजी भंवर सिंह पलाडा यांनी संध्याकाळी महिला पोलीस अधिकाऱ्याला फोन केला आणि विचारले तू कुठे आहेत? महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वत: भिलवाडा क्वार्टरमध्ये असल्याचे सांगितले.

पलाडा म्हणाले की, माझी गाडी टोलनाक्यावर बंद पडली आहे. मी वैतागलो आहे. सध्या माझी पत्नी निवडणूक हरली आहे. रस्त्यावर माझा आणखी एक तमाशा निर्माण होत आहे. मी रस्त्यावर उभे राहिलो तर मला बरे वाटणार नाही. मी तुझ्या क्वार्टरला येईन. गाडी दुरुस्त झाल्यावर मी निघेन. महिला पोलीस अधिकाऱ्याने अगोदरच माहिती असल्याने ठीक असल्याचे सांगितले. सुमारे अर्ध्या तासानंतर, भंवरसिंग पलाडा हे 13 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 7 वाजता क्वार्टरमध्ये आले. महिला पोलीस अधिकाऱ्याने भंवरसिंग पलाडा यांना बाहेर हॉलमध्ये बसवले आणि पाणी पिऊन ते स्वयंपाकघरात चहा करायला गेले. दरम्यान, सायंकाळी 07.05 च्या सुमारास पलाडा याने मागून येऊन दमदाटी केली. त्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बलात्कार केला. महिला पोलीस अधिकारी बेशुद्ध पडल्या. 15-20 मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर पलाडा तिथे उपस्थित होता.

महिला अधिकाऱ्याने एसपीला बलात्काराबाबत सांगण्यास सांगितले.तेव्हा पलाडाने तिचे पाय धरले आणि रडत माफी मागायला सुरुवात केली. पलाडाने भगवान शिवाचा आशीर्वाद घेऊन महिला अधिकाऱ्याशी लग्न करण्याचे वचन दिले.पत्नीचा दर्जा देऊन सांगितले. ती घाबरली. दुसऱ्या दिवशी तक्रारदाराने या घटनेची माहिती लहान बहिणीला दिली. भीतीने तक्रारदाराने एफआयआर दिला नाही. रिपोर्टमध्ये पीडितेने सांगितले की, 13 डिसेंबर 2018 रोजी बलात्कार झाल्यानंतर भंवर सिंग पलाडा यांचे फोन, व्हॉट्सअॅप कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्स दिवसातून अनेक वेळा येऊ लागले.प्रत्येक वेळी महिला पोलीस अधिकाऱ्याने पलाडाला माझ्याशी ताबडतोब लग्न करण्यास सांगितले, त्याने मला आश्वासन दिले की, मी आधी स्वतःच्या पायावर उभे राहीन आणि नंतर माझे लग्न करेन. फक्त FIR करू नका. दररोज आश्वासने देऊन आणि तिच्या आवडत्या भगवान शिवाची शपथ घेऊ लागल्याने महिला अधिकाऱ्याला तो याबाबत गंभीर आहे आणि आपली चूक सुधारण्यासाठी त्याच्याशी लग्न करेल असं वाटलं. यानंतर डिसेंबर 2018 च्या शेवटच्या आठवड्यात भिलवाडा सर्किट हाऊस येथे थांबले आणि महिला अधिकाऱ्याला फोन करून बोलावले. त्यानंतर तिला येण्यास नकार दिला. कारण येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मीच तिथे  येतो. असे म्हणत पलाडा महिला ऑफिसरच्या क्वार्टरमध्ये आला. तिथे आपल्या चुकीबद्दल माफी मागितल्यानंतर मी लग्न करणार असल्याचे सांगितले. तो तिच्याशी छेडछाड करू लागला. त्यावर तिने पलाडाला क्वार्टरबाहेर फेकले.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसRajasthanराजस्थानBJPभाजपा