शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

मालाड स्थानक परिसरात लोकलमध्ये हेडफोन्स विकणाऱ्या अंध मुलीवर बलात्कार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 8:54 AM

पुण्याच्या ससून रुग्णालयाने दिली बोरीवली रेल्वे पोलिसांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाड रेल्वेस्थानक परिसरात अनोळखी व्यक्तीने बलात्कार करत मोबाइल पळवून नेल्याचा आरोप २५ वर्षीय अंध मुलीने केला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारादरम्यान ती गर्भवती असल्याचे उघड झाल्यावर बोरीवली रेल्वे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलीस तपास करत आहेत.

पीडित मुलगी ही लोकलमध्ये मोबाइल हेडफोन्स आणि अन्य सामग्री विकायची. बोरिवली रेल्वे पोलिसांना ससून रुग्णालयातून दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. यात मालाड रेल्वे स्थानकावर तीन महिन्यांपूर्वी पीडित मुलीवर अनोळखी व्यक्तीने बलात्कार केला. तसेच तिचा मोबाइलही पळवून नेला. पोटात दुखू लागल्याने ती ससून रुग्णालयात उपचारासाठी गेली तेव्हा ती गर्भवती असल्याचे तिला समजले, अशी माहिती देण्यात आली. तेव्हा बोरिवली रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पीडित मुलगी अहमदनगरच्या केडगाववरून उस्मानाबाद, लातूर, खेड करत उल्हासनगरला गेली. तिथे चार दिवस राहिल्यावर ती लोकलने मालाड स्थानकात आली. त्यानंतर पुन्हा रेल्वेने ती लातूरला गेली व तिथे तीन महिने राहून नंतर तिने स्वारगेट गाठले. त्या ठिकाणी मैत्रिणीच्या मदतीने ती  कामावर राहिली. तिथे तिच्या पोटात दुखू लागल्याने ती ससूनला गेली तेव्हा  ती गर्भवती असल्याचे उघड झाले.

असा प्रकार घडणे कठीणचबोरीवली पोलिसांच्या हद्दीत २५० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच रेल्वे पोलीस व आरपीएफचा येथे मोठा बंदोबस्त असतो. त्यामुळे मालाड रेल्वेस्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात असा प्रकार घडणे कठीणच आहे. मात्र आम्ही गुन्हा दाखल केला असून तथ्य पडताळणी सुरू आहे.- अनिल कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे

टॅग्स :localलोकलMumbaiमुंबई