उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, शिक्षकासह तिघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 21:18 IST2019-12-17T21:17:07+5:302019-12-17T21:18:02+5:30
आरोपींना सक्त कारवाईची मागणी महिला संघटना व राजकीय पक्षाकडून होत आहे.

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, शिक्षकासह तिघे अटकेत
उल्हासनगर : कॅम्प नं-५ परिसरात राहणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी तिघांना अटक केली असून, आरोपी पैकी एकजण चक्क शिक्षक निघाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-5 परिसरातील 14 वर्षाच्या मुलीचे 7 डिसेंबरला अपहरण झाल्याची तक्रार हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलिस तपासात मुलगी 15 डिसेंबरला कल्याण परिसरात मिळून आली. मुलीला बोलते केले असता जिवे मारण्याची धमकी देऊन भोईर व प्रियकर असलेल्या सरगर नावाच्या तरुणाने आपले अपहरण करून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची माहिती दिली. तसेच 22 जून 2019 रोजी ओळखीच्या जाधव नावाच्या मुलानेही अत्याचार केल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांनाही सोमवारी रात्री अटक केली असून मुलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याप्रकाराने खळबळ उडाली असून आरोपींना सक्त कारवाईची मागणी महिला संघटना व राजकीय पक्षाकडून होत आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिघा पैकी भोईर नावाचा इसम चक्क शिक्षक असल्याची माहिती हिललाईन पोलिसांनी दिली. या त्रिकूटने असेच कृत्य अन्य मुली सोबत केले काय? याबाबतचा तपास पोलीस करीत असून मोठा अनैतिक प्रकार तपासात उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.