शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
4
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
5
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
6
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
7
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
8
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
9
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
10
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
11
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
12
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
13
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
14
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
15
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
16
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
17
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
18
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
19
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
20
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

Rape in Tatto Parlour: 'टॅटू काढणाऱ्यानेच बलात्कार केला'; कॉलेज तरुणीच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; दोन डझन महिलांच्या आल्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:58 IST

Rape in Tattoo Parlor on Women's: आजकाल शरीराच्या कोणत्याही अंगावर टॅटू काढून घेण्याची क्रेझ आली आहे. परंतू याच क्रेझने जवळपास दोन डझन तरुणी, महिलांची इज्जत लुटली गेली आहे. केरळमधील कोच्ची शहरातील एका टॅटू पार्लरमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आजकाल शरीराच्या कोणत्याही अंगावर टॅटू काढून घेण्याची क्रेझ आली आहे. परंतू याच क्रेझने जवळपास दोन डझन तरुणी, महिलांची इज्जत लुटली गेली आहे. केरळमधील कोच्ची शहरातील एका टॅटू पार्लरमुळे मोठी खळबळ उडाली आहे. १८ वर्षांच्या कॉलेज तरुणीने तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार सोशल मीडियावर टाकल्यानंतर सारा प्रकार उघड झाला आहे. 

कोची पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत कारवाईला सुरुवात केली आहे. या पोस्टमुळे २०हून अधिक महिला समोर आल्या असून त्यांनीही आरोपीवर बलात्कार, लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली आहे. तक्रारदार तरुणीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ती लोवर बॅकवर टॅटू काढण्यासाठी टॅटू पार्लरमध्ये गेली होती. यासाठी तिला प्रायव्हसीची गरज होती. याचा फायदा उठवून टॅटू आर्टिस्टने तिला लैंगिक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यामुळे तिला विचित्र वाटू लागले. यानंतर या टॅटू वाल्याने मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. 

पीडितेला तिथून सुटका करून घ्यायची होती.  परंतू ती अशी अडकली की तिथे ती एक शब्दही बोलू शकली नाही. मी त्याला रोखू शकले नाही. मला वाटत होते की मी तिथेच मरून जावे. मी त्याला नाही सुद्धा म्हटले नाही. मी संपल्याचे मला वाटू लागले होते, असे तिने सांगितले. पीडितेच्या पोस्टनंतर, आणखी दोन महिला पुढे आल्या ज्यांनी त्याच टॅटू पार्लरबद्दल अशाच घटनेचा उल्लेख केला. त्यापैकी एकीने इन्स्टावर याबाबत पोस्ट केली होती. तेव्हा तिला आणखी २० महिलांनी आपल्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे म्हटले होते. 

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा परिस्थितीत मुलीची लेखी तक्रार आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही मेडिकल करू. आम्ही त्या नंबरवर बोललो, त्यानंतर एका व्यक्तीने फोन उचलला आणि काही वेळात सांगेन की लेखी तक्रार करायची आहे की नाही, असे सांगितले. मात्र, टॅटू स्टुडिओ सध्या बंद आहे. त्याचे घरही बंद आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगKeralaकेरळ