शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये उद्योजक तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 14:31 IST

या प्रकरणी वानवडी पोलिसांनी बाणेर येथील तरुणावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़. 

पुणे : उद्योजक तरुणीच्या घरातील लोकांसमोर मंगळसुत्र आणि कुंकु लावून लग्न केल्याचा आभास निर्माण करुन तिच्यावर मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जबरदस्तीन शारीरिक संबंध ठेवून ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी बाणेर येथील तरुणावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़. 

अमित रंजन महापात्रा (वय ३०, रा़ श्रीपल होम्स, अजिंक्य पार्क, बाणेर) असे या तरुणाचे नाव आहे़. ही घटना ७ जुलै ते ५ आॅक्टोंबर २०१८ दरम्यान बाणेर येथील महापात्रा याच्या घरी तसेच मुंबईतील हॉटेल सन अँड सॅन या ठिकाणी घडली़. याप्रकरणी वानवडीतील २९वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे़.याबाबत पोलिसांनी सांगितले की,  या तरुणीच्या कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय आहे़. सध्या ती हा व्यवसाय चालविते़. अमित महापात्रा हा काही काम धंदा करत नाही़. या दरम्यान दोघांची ओळख झाली़ त्याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले़. आपणही बिझनेस करणार असल्याचे भासवून त्यासाठी तिच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये घेतले़. 

आपले हे नाटक खरे वाटावे , म्हणून त्याने तिच्या घरातील लोकांच्या समक्ष या तरुणीला मंगळसुत्र घातले व कुंकुही लावले आणि लग्न झाल्याचा आभास निर्माण केला़. या लग्नानंतर त्याने तिला आपल्या बाणेर येथील घरी नेले़. तेथे  तसेच मुंबईतील जुहू येथील हॉटेल सन अँड सॅनमध्ये नेले़. तेथे तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले़. या बनावट लग्नानंतर काही दिवसातच या तरुणीला त्याचे खरे रुप लक्षात येऊ लागल्यावर त्यांच्यात वाद होऊ लागले़, तेव्हा तो तिला हाताने मारहाण व शिवीगाळ करु लागला़. शेवटी या छळाला कंटाळून या तरुणीने वानवडी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता़. या अर्जाची दखल घेऊन पोलिसांनी अमित महापात्रा याच्याविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़. महिला पोलीस उपनिरीक्षक गिरीजा म्हस्के अधिक तपास करीत आहेत़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कार