पोलिसाकडून पोलीस शिपाई महिलेवर बलात्कार; दादर भोईवाडामधील धक्कादायक घटना
By मुकेश चव्हाण | Updated: January 21, 2021 10:27 IST2021-01-21T10:27:24+5:302021-01-21T10:27:35+5:30
याप्रकरणी भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसाकडून पोलीस शिपाई महिलेवर बलात्कार; दादर भोईवाडामधील धक्कादायक घटना
मुंबई: राज्यात पुन्हा एकदा पोलिसांच्या प्रतिमेला धक्का देणार घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस हवालदाराने पोलीस शिपाई महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. याप्रकरणी भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपी 2015 पासून लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार करत होता.तसेच आरोपी पोलीस तिला मद्यधुंद अवस्थेत मारहाण देखील करत होता. लग्नाचे आमीष दाखवणाऱ्या आरोपी पोलिसाचे आधीच लग्न झाल्याचे काही दिवसांनी समजले. त्यांनंतर पीडित पोलीस शिपाई महिलेनं पोलिसांत धाव घेत तक्रार केली. त्यानंतर पोलीस याप्रकरणाबाबत अधिक तापस करत आहे. संबंधित महिला देखील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दित राहण्यास आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, पीडित महिला पोलीसला लग्नाचे आमीष दाखवून २०१५ पासून शारिरीक संबंध ठेवले. मात्र पुढे लग्नाबाबात पीडितेने विचारले असता, आरोपी टाळाटाळ करत होता. त्यानंतर पीडितेला संशय आल्यानं, तिने याबाबत चौकशी केली. चौकशी केल्यानंतर पीडितेला धक्काच बसला. आरोपीचे याआधीच लग्न झालं असल्याची पीडितेला माहिती मिळाली. त्यानंतर पीडितेने याबाबत जाब विचारला असता, आरोपीने तिला मारहाण केली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच संबंधित पोलीस महिलेने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला.