शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

गतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण; आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 22:08 IST

Rape case of minor girl : सत्र न्यायालयाचा निर्णय 

ठळक मुद्देआरोपीला धमकी देण्याच्या गुन्ह्यात ६ महिने कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने आरोपी आकाश बंकट येदानी (२३) याला १६ वर्षांखालील गतीमंद मुलीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. के. जी. राठी यांनी सोमवारी हा निर्णय दिला.

आरोपीला धमकी देण्याच्या गुन्ह्यात ६ महिने कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. दंडाची संपूर्ण रक्कम पीडित मुलीला अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला ४ नोव्हेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे.

आरोपी तरोडा, ता. काटोल येथील रहिवासी असून तो विवाहित व व्यवसायाने मजूर आहे. त्याला दोन मुलेदेखील आहेत. पोलीस तक्रारीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मजूर असून ते रोज कामावर जात होते. त्यामुळे पीडित मुलगी घरी एकटीच रहात होती. आरोपी त्याचा फायदा घेत होता. मुलगी एकटी असताना आरोपी तिच्या घरी जात होता व विविध प्रलोभणे देऊन तिच्यावर बलात्कार करीत होता. त्याने स्वत:चे कुकृत्य लपवण्यासाठी मुलीला ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे मुलगी गप्प राहिली. १ नोव्हेंबर २०१८ रोजी मुलगी आजारी पडल्यानंतर तिला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे आढळून आले. दरम्यान, मुलीला सक्तीने विचारपूस करण्यात आली असता आरोपीच्या कुकृत्याचा भंडाफोड झाला. 

डीएनए चाचणीने दिले बळआरोपीविरुद्धच्या गुन्ह्याला डीएनए चाचणीने बळ दिले. चाचणीच्या अहवालातून आरोपी हा पीडित मुलीच्या गर्भातील बाळाचा पिता असल्याचे सिद्ध झाले. याशिवाय, सरकारने आरोपीविरुद्ध १७ साक्षिदार तपासले. तसेच, ठोस वैद्यकीय पुरावे सादर केले. सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणnagpurनागपूरjailतुरुंगSessions Courtसत्र न्यायालय