शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"काँग्रेस आमदाराच्या मुलाने बलात्कार केला, जीवे मारण्याची दिली धमकी", महिला कार्यकर्तीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 17:21 IST

Karan Morwal Rape Case has been Registered : आमदाराच्या मुलाने जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने केला आहे.

इंदूर  - मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेस आमदाराच्या मुलाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आमदाराच्या मुलाने जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडनगर भागातील काँग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण मोरवाल याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणने लग्नाचं आमिष दाखवत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. 

स्टेशन प्रभारी ज्योती शर्मा यांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने गेल्या वर्षी करणशी ओळख झाली होती. त्यानंतर काही महिन्यांआधी तो तरुणीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याने बलात्कार केला तसेच कोणाला काही सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तसेच याची एक ऑडिओ क्लिप असल्याचं देखील तिने म्हटलं आहे. 

आमदाराच्या मुलाने आपल्याला धमकी दिल्याचा आणि याचा ऑडिओ रेकॉर्डिंग स्वरुपात आपल्याकडे पुरावा असल्याचा दावा संबंधित तरुणीने केला आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेस आमदार मुरली मोरवाल यांनी आपल्या मुलाविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. पीडित तरुणी ही काँग्रेसची एक कार्यकर्ती आहे. गेल्या वर्षी तिची करण सोबत ओळख झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

धक्कादायक! भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या, गेल्या 8 दिवसांत हत्येच्या 7 घटनांनी खळबळ

उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 8 दिवसांत तब्बल हत्येच्या 7 घटना घडल्या आहेत. गोरखपूरमधील भाजपचे नेते आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले माजी सरपंच बृजेश सिंह (BJP Brijesh Singh) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या आठ दिवसांत हत्येच्या तब्बल सात घटना घडल्याने गोरखपूरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशujjain-pcउज्जैनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस