बलात्कारप्रकरण : अभिनेता करण ओबेरॉयला हायकोर्टाने जामीन केला मंजूर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 15:39 IST2019-06-07T15:36:54+5:302019-06-07T15:39:17+5:30

ओशिवरा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दाखल केली

Rape case : Actor Karan Oberoi has granted bail by the High Court | बलात्कारप्रकरण : अभिनेता करण ओबेरॉयला हायकोर्टाने जामीन केला मंजूर   

बलात्कारप्रकरण : अभिनेता करण ओबेरॉयला हायकोर्टाने जामीन केला मंजूर   

ठळक मुद्दे५० हजाराच्या जात मुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.अभिनेता करण ओबेरॉय याला आज मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला.

मुंबई - महिला ज्योतिषावर बलात्कार केल्याचा आरोप असलेला हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता करण ओबेरॉय याला आज मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. ५० हजाराच्या जात मुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अभिनेता करणने एका ज्योतिषी असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्काराचा व्हिडीओ तयार करून पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच पैसे न दिल्यास पीडितेला व्हिडीओ वायरल करण्याची धमकी दिली. याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 



 

Web Title: Rape case : Actor Karan Oberoi has granted bail by the High Court