शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! बिस्किटाचे आमिष दाखवून 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 14:19 IST

Crime News : डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून मुलीचा जीव वाचवला आहे.

नवी दिल्ली - पंजाबच्या कपूरथलामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चिमुकलीला बिस्किटाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. सध्या तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मुलीवर मंगळवारी सकाळी अमृतसरच्या मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून मुलीचा जीव वाचवला आहे. मुलीची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कपूरथला सुलतानपूर लोधी मार्गावर सोमवारी दुपारी हुसैनपूरमध्ये झोपडीत राहणाऱ्या 26 वर्षीय आरोपीने सात वर्षीय मुलीवर बलात्कार केला. घटना घडली त्यावेळी मुलीचे आईवडील हे कामासाठी बाहेर गेले होते. आरोपीने मुलीला बिस्किटाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

मुलीचे आईवडील कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरी नव्हती. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. काही वेळाने जवळ असलेल्या एका झोपडीत मुलगी जखमी अवस्थेत आढळून आली. मुलीला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सुलतानपूर लोधी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली.मुलीची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी तिला अमृतसर येथील मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठवले. या घटनेने पीडितेचे आईवडील हादरले आहेत. त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. 

मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून ते हुसैनपूरच्या झोपडीत राहतात. मजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. त्यांना तीन मुली आणि दोन मुले आहेत. त्यांची सर्वात लहान मुलगी सात वर्षांची असून, तिला बिस्किटाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला कोर्टात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाबPoliceपोलिस