शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
2
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
5
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
6
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
7
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
8
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
9
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
10
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
11
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
12
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
13
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
14
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
15
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
16
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
17
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
18
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
19
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
20
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

किरण गोसावीचं Whats App चॅट आले समोर; आर्यन खानला अडकवून खंडणी वसुलीचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 4:39 PM

Kiran Gosavi's Whats App chat came into light : प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांच्यात ३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ८.१६ वाजता Whats App द्वारे चॅटिंग झालं होतं. या चॅटमध्ये किरण गोसावी याने प्रभाकरला मेसेज करून खालील प्रमाणे सांगितले. 

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात स्वतंत्र  साक्षीदार प्रभाकर साईल आणि किरण गोसावी या दोघांमध्ये २ आई ३ ऑक्टोबरदरम्यान Whats App द्वारे झालेलं चॅट समोर आले आहे. यात किरण गोसावी अँड कंपनी एनसीबीच्या नावाने कशी वसुली करत होती. याचे एक एक पुरावे उघडकीस येत आहेत.प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांच्यात ३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ८.१६ वाजता Whats App द्वारे चॅटिंग झालं होतं. या चॅटमध्ये किरण गोसावी याने प्रभाकरला मेसेज करून खालील प्रमाणे सांगितले. 

गोसावी- हाजीअलीला जा

मी सांगितलेले काम पूर्ण कर आणि घरी परत येप्रभाकर - हो सरगोसावी - दाराला कुलूप लावा आणि खिडकीतून चावी हॉलमध्ये फेकून द्या 

प्रभाकर - होगोसावी - लवकर जा आणि लवकर ये

प्रभाकरच्या प्रतिज्ञापत्रानुसार, गोसावी यांनी त्याला हाजी अली येथे जाऊन इंडियाना हॉटेलजवळील कोणाकडून ५० लाख रुपये रोख घेण्यास सांगितले होते आणि प्रभाकर सकाळी 9:45 वाजता तेथे पोहोचला तेथे एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि त्याने प्रभाकरला भरलेल्या 2 पिशव्या दिल्या.२ ऑक्टोबर रोजी दुपारी १.२३ वाजता किरण गोसावी यांनी प्रभाकर याला Whats Appवर काही लोकांचे फोटो पाठवले होते आणि सांगितले होते की, जर हे लोक क्रुझवर ग्रीन गेटमधून बाहेर पडताना दिसत असतील तर सांग. या गोष्टींचा उल्लेखही साईलने आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. हे सर्व चॅट्स मिळाले आहेत, ज्यावरून गोसावीने प्रभाकरला १० लोकांचे फोटो पाठवले होते. त्यापैकी एकाला प्रभाकर याने ओळखले आणि गोसावी याला Whats Appद्वारे याबाबत माहिती दिली. प्रभाकरच्या प्रतिज्ञापत्रानुसार, दुपारी ४. २४ वाजताच्या सुमारास गोसावी याने प्रभाकरला सांगितले की, एनसीबीने या प्रकरणी 13 जणांना अटक केली आहे.काही फोटो पुरावे म्हणून सापडले असून ज्यात प्रभाकरने क्रुझजवळ उभे राहून सेल्फी काढला आहे आणि ज्यात गोसावी NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मागे तात्काळ उभे असल्याचे दिसत आहे. जेणेकरुन वानखेडे यांना त्याच्याबद्दल माहिती आहे असे वाटावे. हा खाजगी व्यक्ती नसून एनसीबीचा कर्मचारी आहे, असे भासवण्याचा प्रयत्न असावा. दुसऱ्या चॅटमध्ये प्रभाकर आणि एनसीबी कर्मचारी समीर सालेकर यांच्यातील आहे. 

साईलने आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले होते की, मला पंच बनवून १० कोर्‍या कागदांवर स्वाक्षरी करायला लावली होती. पण जेव्हा हे घडत होते तेव्हा त्याच्याकडे आधार कार्ड नव्हते. या चॅटमध्ये प्रभाकर याने एनसीबी कर्मचारी समीर सालेकर यांना त्यांचे आधार कार्ड पाठवले असल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण चॅटवरून कार्डिलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीचा गोसावी आणि टिमने कसा गैरफायदा उचलला हे तर समोर येत आहे. मात्र, अद्याप तरी यात कुठल्या एनसीबी अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचं आढळून आलेलं नाही. जर का तसं झालं तर आतापर्यंत एनसीबीने केलेल्या प्रत्येक कारवाईवर प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेDrugsअमली पदार्थWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCourtन्यायालय