शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल मालकाकडे मागितली १० लाखांची खंडणी : क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचा बनाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 21:42 IST

तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आलेल्याला पकडले आहे. तुम्ही जर तातडीने १० लाख रुपये दिले नाही तर तुमच्याविरुध्द गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करू... असा फोन खणाणला आणि..

ठळक मुद्दे पिस्तुल खरेदी करण्यासाठी पाठवलेल्या तुमच्या माणसाला पकडल्याचे सांगितले याप्रकारचा आणखी एक गुन्हा एका पेट्रोल पंपचालकाबाबत होता घडला

पुणे : तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आलेल्याला पकडले आहे. तुम्ही जर तातडीने १० लाख रुपये दिले नाही तर तुमच्याविरुध्द गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करू, असे पांचाली हॉटेलच्या मालकास धमकावल्या प्रकरणी फोन करून क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल वामन भिडे (वय ५५, रा. जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे जंगली महाराज रस्त्यावर पांचाली नावाचे हॉटेल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे यांनी दिली. यासंदर्भात सविस्तर असे की, फिर्यादीला बुधवारी रात्री बाराच्या सुमारास एका मोबाइल क्रमांकावरुन फोन आला होता. कॉल करणाऱ्याने मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगितले. मुंबई येथे एका व्यक्तीला पिस्तूल खरेदी करताना पकडले आहे. त्याने तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आल्याचे सांगितले आहे. गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुम्ही १० लाख रुपये द्या. अन्यथा गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करण्यात येईल, असे त्याने धमकावले. त्यामुळे भिडे यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे करत आहेत..........................असा घडतो गुन्हा  ज्याच्याकडे खंडणी मागायाची आहे, तो कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहातो याचा अभ्यास तोतया अधिकारी करतो. त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला फोन करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव विचारुन घेतो. यानंतर रात्री बारा ते पहाटे चार दरम्यानच संबंधीत पोलीस ठाण्यात कॉल करून, ठाणे अंमलदाराला तुमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी बोलण झाल्याचे भासवतो. ज्याच्याकडे खंडणी मागायची आहे, त्याला पोलीस ठाण्याला बोलावून घेण्यास सांगितले जाते. इतक्या रात्री पोलिसांनी बोलावले असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्ती घाबरून गेलेला असतो. हा व्यक्ती पोलीस ठाण्यात हजर होताच, त्याच्या मोबाइलवर फोन करून सेटलमेंटसाठी दबाव टाकला जातो.  व्यक्ती सेटलेमेंटला तयार झाल्यास त्याला मुंबईला पैसे घेऊन बोलावले जाते.   .....................यापूर्वी देखील घडला असा प्रकार याप्रकारचा आणखी एक गुन्हा एका पेट्रोल पंपचालकाबाबत घडला होता. त्यालाही अशाचप्रकारे धमकावून पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. मात्र संबंधीत पेट्रोल पंप चालकाने तक्रार दाखल केली नाही. या गुन्ह्यातही तोच प्रकार झाला आहे........................... याप्रकारे फसवणूकीच्या घटना लक्षात घेता, ठाणे अंमलदारांना निर्देश देण्यात आले आहेत की संबंधित अधिकाऱ्याने पत्र दिल्याशिवाय किंवा त्याने पथक पाठवल्याशिवाय कोणाही व्यक्तीस पोलीस ठाण्यात बोलावून घेऊ नये. - प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक