शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Ranchi Violence : माझा मुलगा हिंसाचारात सहभागी नव्हता, तरीही पोलिसांनी गोळ्या घातल्या; मृत तरुणाच्या वडिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:16 IST

Ranchi Violence : पोलिसांवर आरोप करताना ते असेही म्हणाला की, 'पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.'

Ranchi Violence:रांचीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारात दोन मुस्लिम तरुणांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचे नाव साहिल आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी एबीपी न्यूजच्या टीमशी संवाद साधला आणि दावा केला की, 'त्यांचा मुलगा हिंसाचारात सहभागी नव्हता'. पोलिसांवर आरोप करताना ते असेही म्हणाला की, 'पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.'

मृताचे वडील मोहम्मद अफजल यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, माझा मुलगा साहिल हिंसाचारात सहभागी नव्हता. शुक्रवारी ही घटना घडलेल्या मुख्य रस्त्यावरील एका दुकानात साहिल कामाला होता. हिंसाचार सुरू झाल्यावर सर्व दुकाने बंद होऊ लागली. माझा मुलगा मुख्य रस्त्याने घरी जात असताना पोलिसांनी त्याच्या पाठीमागे गोळी झाडली. मोहम्मद अफझल यांनी दावा केला की, "माझा मुलगा आंदोलनात सहभागी नव्हता. मी पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे, मला न्याय आणि नुकसानभरपाई हवी आहे."

माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या?, त्याचा दोष काय?; आईचा संतप्त सवालइस्लाम जिंदाबाद, नुपूर शर्मा मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्याशुक्रवारच्या नवाजनंतर मोठ्या संख्येने मुस्लीम समाजाचे लोक मुख्य मार्गावर निदर्शने करत असल्याचे सांगण्यात येत होते. इस्लाम जिंदाबाद, नुपूर शर्मा मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. घटनेच्या दिवशी स्थानिक मुलांचा निदर्शनात सहभाग होता पण सर्वजण शांततेने निदर्शने करत होते. पोलिसांच्या मागे उभ्या असलेल्या लोकांनी आधी दगडफेक केल्याचा दावा केला जात आहे, त्यानंतर आंदोलक संतप्त झाले आणि पोलिसांनी टोकाचे पाऊल उचलले. काही वेळातच निदर्शनाचे हिंसाचारात रूपांतर झाले. आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. मंदिर आणि आजूबाजूची दुकाने, वाहने, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार सुरू केला. ज्यात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :FiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूJharkhandझारखंड