शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगातून बाहेर आलेला राम रहीम खरा की खोटा, प्रकरण पोहोचले हायकोर्टात... नेमकं काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 20:21 IST

Ram Rahim came out From Jail : आम्हाला खात्री आहे की, बाबा राम रहीमला बदलले आहे. यावेळी बागपतच्या आश्रमात जो राम रहीम आहे तो खोटा, डुप्लिकेट आहे.

एकच व्यक्ती दोन ठिकाणी उपस्थित राहू शकते का? असाच दावा पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात एका व्यक्तीने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम यांच्याबाबत केला होता. सोमवारी या रंजक प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. गुरमीत राम रहीमच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती की, गुरमीत राम आजकाल जो व्हिडिओ जारी करत आहे तो खोटा असून खरा गुरमीत राम रहीमचे अपहरण करण्यात आले आहे.या खटल्याची सुनावणी करताना न्यायाधीश म्हणाले की, कदाचित वकिलाने वैज्ञानिक कथा असलेला चित्रपट पाहिला असेल. या प्रकरणात, खटला मागे घेतला जाईल किंवा फेटाळला केला जाईल. न्यायालयाने म्हटले की, राम रहीम 17 जूनला 21 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला, मग त्याचे अपहरण कसे झाले? अशा प्रकरणांची सुनावणी घेण्यासाठी न्यायालय तयार केलेले नाही. त्याचवेळी हरियाणा सरकारने सांगितले की, राम रहीमला कडक सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचे अपहरण होणे शक्य नाही. दोन अनुयायांवर झालेल्या बलात्कार प्रकरणात राम रहीम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.न्यायाधीशांनी वकिलाला सांगितले की, या प्रकरणी याचिका मांडताना त्यांनी किमान मनाचा वापर केला असता. मानवी क्लोनिंग शक्य आहे का? हे सर्व वर्तमानपत्र आणि टीव्हीवर चालू आहे. फिल्मी बोलू नका. यानंतर हायकोर्टाने राम रहीमची याचिका खोटी ठरवून फेटाळून लावली.या प्रकरणी मीडियाशी बोलताना गुरमीत राम रहीमचे प्रवक्ते आणि वकील जितेंद्र खुराना म्हणाले की, अशा प्रकारे याचिका करून डेरा सच्चा सौदाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हेच लोक अशी याचिका करून डेरा सच्चा सौदाच्या इतर प्रकरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार असले तरी आम्ही याप्रकरणी लक्ष घालू.येथे राम रहीम संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे अशोक कुमार म्हणाले की, याचिका फेटाळल्यानंतर आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. आम्ही आता तेथे याचिका दाखल करू. आम्हाला खात्री आहे की, बाबा राम रहीमला बदलले आहे. यावेळी बागपतच्या आश्रमात जो राम रहीम आहे तो खोटा, डुप्लिकेट आहे.

टॅग्स :Dera Saccha Saudaडेरा सच्चा सौदाHigh Courtउच्च न्यायालयsexual harassmentलैंगिक छळjailतुरुंग