'तांडव' विरोधात राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 06:20 PM2021-01-20T18:20:23+5:302021-01-20T18:21:46+5:30

Tandav Webseries : अभिनेता सैफ अली खानचा आरोपी म्हणून समावेश, घाटकोपर पोलिसांकड़ून तपास सुरु

Ram Kadam has lodged a case against 'Tandav' Webseries at Ghatkopar police station | 'तांडव' विरोधात राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल

'तांडव' विरोधात राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्दे याप्रकरणी संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे. 

मुंबई : 'तांडव' वेब सिरीजमधील काही दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आमदार राम कदम यांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठीय्या आंदोलन केले. बुधवारी कदम यांच्या तक्रारीवरून घाटकोपरपोलिसांनीतांडवमधील अभिनेता सैफ अली खानसह संबंधित कलाकाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        

तांडव या वेब सिरिजमध्ये आक्षेपार्ह देखावे आणि  संवादामुळे हिंदू देव देवतांची विटंबाना केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  त्यामुळे ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुंबईसह ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर देखील तांडव विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी दोन दिवस आंदोलन सुरु होते. अखेर बुधवारी राम कदम यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी तांडवच्या समूहा विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. यात आरोपीमध्ये अभिनेता सैफ अली खान, अली अब्बास जफर, हिमांशु कृष्णा मेहरा, गौरव सोलंकी, अपर्णा पुरोहीत, अमित अग्रवाल तसेच वेब मालिकेतील अन्य कलाकार यांच्या नावाचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे. 

 

Web Title: Ram Kadam has lodged a case against 'Tandav' Webseries at Ghatkopar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.