राळेगावात साडेपाच लाख रुपये जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 18:59 IST2019-10-03T18:53:25+5:302019-10-03T18:59:26+5:30
एका बसमधून दापोरी येथे पाच लाख ७० हजार रुपये जप्त केले.

राळेगावात साडेपाच लाख रुपये जप्त
राळेगाव (यवतमाळ) - निवडणूक विभागाच्या स्थीर पथकाने गुरुवारी एका बसमधून दापोरी येथे पाच लाख ७० हजार रुपये जप्त केले. युवराज अगडे रा. वर्धा यांच्या स्कूल बॅगमध्ये ही रक्कम आढळली.
निवडणूक विभागाने स्थीर पथकाची निर्मिती केली आहे. या पथकाने गुरुवारी राळेगाव ते वर्धा या बसची (क्र.एम.एच.४०-एन-८१७५) दापोरी येथे तपासणी केली. यावेळी युवराज अगडे रा. वर्धा याच्या स्कूल बॅगमध्ये पथकाला पाच लाख ७० हजारांची रोकड आढळली. युवराजला पथकाने विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे ही रोकड आचारसंहिता कक्ष प्रमुखांच्या मार्गदर्शनात कोषागारात जमा करण्यात आली. ही कारवाई दापोरीचे स्थीर पथक प्रमुख महेश इंगोले, दीपक धनरे, पोलीस शिपाई संतोष मारबते यांनी केल्याचे कक्ष प्रमुख दिलीप बदकी यांनी सांगितले.