शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'दृश्यम' चित्रपटातून घेतली आयडिया; पत्नीच्या प्रियकराला मारुन घरात पुरले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:43 IST

देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वॉकर मर्डर प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला यानेही घटनेपूर्वी 'दृश्यम' सिनेमा पाहिला होता.

राजकोट: देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वॉकर मर्डर प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला (28) याने घटनेपूर्वी 'दृश्यम' सिनेमा पाहिला होता. आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीदरम्यान ही बाब समोर आली. दरम्यान, तिकडे गुजरातमधील राजकोटमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. दृश्यम या चित्रपटासारखीच एक घटना समोर आली आहे.

चित्रपटाची आयडिया घेऊन राजकोटमध्ये एका तरुणाची हत्या करून मृतदेह पुरण्यात आला. गौतम गोहेल हा तरुण गुजरातमधील तरघडी येथे राहत होता. गौतमचे त्याच्याच गावातील एका गुराख्याच्या बायकोसोबत प्रेम संबंध होते. 2020मध्ये दोघे पळून गेले, मात्र नंतर घरी परतले. याबाबत मेंढपाळाला माहिती मिळताच त्याने गौतमच्या हत्येचा कट रचला.

मेंढपाळाने साथीदारांच्या मदतीने गौतमला भेटायला बोलावले आणि डोक्यात पाईप मारुन त्याची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, मृतदेह त्यांच्याच अंगणात पुरला. पण, कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 14 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे गूढ उकलले. या तरुणाला फोन करणाऱ्या तरुणीला आणि मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपींनी पोलिसांना मृतदेह पुरलेल्या ठिकाणी नेले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मृत तरुणाचे वडील जयंतीभाई घेलाभाई गोहेल यांनी शैलेश उर्फ ​​कालो लक्ष्मण जपडा, त्याचा भाऊ सागर लक्ष्मण जपडा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली. पडझरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत त्यांचा मुलगा 14 नोव्हेंबरपासून गूढ परिस्थितीत बेपत्ता झाल्याचे म्हटले होते. तक्रारीनंतर पोलिसांनी कॉल डिटेल्सवरून तपास सुरू केला अन् हत्येचा खुलासा केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDrishyam 2दृश्यम 2