राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 06:29 IST2025-09-30T06:28:43+5:302025-09-30T06:29:16+5:30
क्राइम ब्रँचने १७ सप्टेंबर रोजी राजेंद्र लोढा यांना अटक केली हाेती.

राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
मुंबई : लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी (एस्प्लनेड कोर्ट) सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
लोढा यांची आर्थिक स्रोतांच्यासंदर्भात चौकशी करताना मिळालेल्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याने त्यांची कोठडी वाढवावी, अशी मागणी पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांकडे केली. सध्या फॉरेन्सिक ऑडिट सुरू असून, आरोपीची चौकशी करणे गरजेचे आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. लोढा यांना अगोदरच १३ दिवस पोलिस कोठडी ठोठावली आहे, असे निरीक्षण नोंदवित दंडाधिकारी न्यायालयाने लोढा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
क्राइम ब्रँचने १७ सप्टेंबर रोजी राजेंद्र लोढा यांना अटक केली हाेती. कंपनीची जमीन, ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स कमी किमतीत विकून लोढा डेव्हलपर्सला ८५ कोटींचा तोटा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.