शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! एकाच कुटुंबातील 4 महिलांवर बलात्कार, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 14:25 IST

Crime News : महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहेत.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहेत. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार झाल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. चारही महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून आरोपीने हे कृत्य केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. विष्षू गुर्जर असं आरोपीचं नाव असून पीडित कुटुंबाच्या घराजवळच त्याचा ढाबा आहे. गेल्या एक वर्षापासून आरोपी कुटुंबातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. त्यानंतर त्याने महिलेच्या लहान बहिणी आणि मुलीलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेला याची माहिती मिळताच तिने पोलिसांत धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच संपूर्ण धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला आहे. 

महिलेने तक्रार दिल्यानंतर कुटुंबातील इतर महिला पुढे आल्या आणि आरोपीविरोधात तक्रार दिली. आरोपीविरोधात 23 आणि 24 जानेवारीला बलात्काराच्या दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून ते अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याच दरम्यान बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. हरियाणाच्या फतेहाबादमध्ये एक लज्जास्पद घटना घडली. भावानेच 5 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार केला आहे. CCTV फुटेजमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय तरूण आपल्या आत्याच्या घरी 15 दिवसांसाठी राहायला आला होता. 

नात्याला काळीमा! भावानेच केला 5 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार; CCTV फुटेजमधून धक्कादायक खुलासा

तरुणाने याच दरम्यान आपल्या आत्याच्या मुलीवर बलात्कार केला आहे. मुलीने आपल्या कुटुंबीयांना तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. त्यावेळी वडिलांनी त्यांच्या घरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज चेक केलं. फुटेज पाहून सर्वांनाच धक्का बसला आणि बलात्काराची ही भयंकर घटना समोर आली आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली  आहे. तरुण मोटार मेकॅनिकचं काम शिकण्यासाठी सिरसा येथून फतेहाबादमध्ये आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

 

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिस