Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:14 IST2025-06-10T13:10:30+5:302025-06-10T13:14:33+5:30

Raja Raghuwanshi Murder Case, Sonam Raghuwanshi Arrested: तीन महिला डॉक्टरांच्या पथकाने सोनमची तपासणी केली

raja raghuwanshi murder case sonam raghuwanshi pregnency report is not clear indore couple missing shillong honeymoon murder meghalaya police interrogation | Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...

Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...

Raja Raghuwanshi Murder Case, Sonam Raghuwanshi Arrested: राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशीची वैद्यकीय तपासणी ( Sonam Raghuvanshi medical test ) सोमवारी, ९ जूनला करण्यात आली. तीन महिला डॉक्टरांच्या पथकाने तिची सखोल तपासणी केली, ज्यात तिच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीबाबत सखोल तपासणी करण्यात आली. डॉक्टरांच्या मते, सोनम खूप घाबरलेली होती. आणि घडलेल्या घटनांचा तिच्या मनाला जबर धक्काही बसल्याचे दिसले. वैद्यकीय तपासणीदरम्यान तिला अशक्तपणाही जाणवत होता, त्यामुळे तिला सकाळपासून एनर्जी ड्रिंक्स आणि ज्यूस देण्यात आले होते. वैद्यकीय अहवालात असे म्हटले आहे की सोनमच्या शरीरावर कोणतीही जखम किंवा मुकामार आढळलेला नाही. याचदरम्यान, सोनमची प्रेग्नंसी टेस्टही ( Pregnancy Test ) करण्यात आली.

गर्भधारणा चाचणीमध्ये गोंधळ

सोनम रघुवंशीची गर्भधारणा चाचणी देखील करण्यात आली होती, परंतु रिपोर्ट्समध्ये स्पष्ट काही समजले नव्हते. डॉक्टरांच्या पथकाने रिपोर्ट्स 'अस्पष्ट' असल्याचे म्हटले आणि सोनमचा अल्ट्रासाऊंड एका आठवड्यानंतर पुन्हा करावा, असा सल्लाही देण्यात आला. त्यांचे म्हणणे आहे की, गर्भधारणेच्या सुरुवातीला योग्य निकाल मिळणे कठीण असते, म्हणून थोडी वाट पाहणे आवश्यक आहे.

मेघालय पोलिसांनी सोनमला सोबत नेले

या अहवालामुळे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे, ज्यामुळे तपास यंत्रणा आता अधिक सतर्क झाल्या आहेत. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मेघालय पोलिसांनी सोनमला त्यांच्यासोबत नेले. ती आधी गाजीपूरला पोहोचली होती. आता पुढील चौकशी मेघालयात होईल, जिथे पोलिस सोनमला घेऊन घटनेशी संबंधित सर्व पैलूंचा सखोल तपास करतील.

सोनमवर तिचा पती राजा रघुवंशी याच्या हत्येचा आरोप

सोनम रघुवंशी शिलाँगमध्ये हनिमूनसाठी गेली होती आणि आता तिच्यावर तिचा पती राजा रघुवंशी याची हत्या केल्याचा आरोप आहे. सुमारे १७ दिवस गूढपणे बेपत्ता राहिल्यानंतर, सोनम रविवारी आणि सोमवारी रात्री उत्तर प्रदेशातील गाजीपूरला पोहोचली. त्यानंतर मेघालय पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सोनमला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने पोलिसांना चौकशीसाठी ७२ तासांसाठी कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली. त्यानंतर कडक सुरक्षेत, पोलिस पथक सोनमला घेऊन शिलाँगला रवाना झाले.

Web Title: raja raghuwanshi murder case sonam raghuwanshi pregnency report is not clear indore couple missing shillong honeymoon murder meghalaya police interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.