Raj Kundra : राज कुंद्राकडून मुंबई पोलिसांना सापडल्या ५१ पॉर्न फिल्म्स; सरकारी वकिलाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 04:25 PM2021-08-01T16:25:13+5:302021-08-01T16:26:16+5:30

Raj Kundra : वकिलाने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्याकडून खूप मजबूत पुरावे मिळाले आहेत.

Raj Kundra: Mumbai police find 51 porn films from Raj Kundra; Public Prosecutor's claim | Raj Kundra : राज कुंद्राकडून मुंबई पोलिसांना सापडल्या ५१ पॉर्न फिल्म्स; सरकारी वकिलाचा दावा

Raj Kundra : राज कुंद्राकडून मुंबई पोलिसांना सापडल्या ५१ पॉर्न फिल्म्स; सरकारी वकिलाचा दावा

Next
ठळक मुद्देसरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिसांना 2 अॅप्समधून 51 पॉर्न चित्रपट सापडले आहेत. राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांनी Whats App ग्रुप आणि चॅट्स डिलीट करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपांनी घेरलेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा याच्या प्रकरणाची शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयाला अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. वकिलाने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्याकडून खूप मजबूत पुरावे मिळाले आहेत.

सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिसांना 2 अॅप्समधून 51 पॉर्न चित्रपट सापडले आहेत. राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांनी Whats App ग्रुप आणि चॅट्स डिलीट करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अशाप्रकारे, हे लोक या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट करत होते, म्हणून त्यांना अटक करणे आवश्यक होते. राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांनी त्यांच्या अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि त्या अटकेला 'बेकायदेशीर' म्हटले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सुनावणीत सरकारी वकिलांनी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाला सांगितले की, आरोपींवर  पॉर्न कॉन्टेंट स्ट्रीम  करण्याच्या गंभीर आरोपांना सामोरे जावे लागत आहे आणि पोलिसांना त्यांच्या फोन आणि स्टोरेज उपकरणांमधून महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. पुढे त्यांनी सांगितले की, राज कुंद्रा आणि लंडनमध्ये राहणारे त्यांचे मेहुणे (प्रदीप बक्षी) यांच्यातील हॉटशॉट्स अॅपवर ईमेल देखील प्राप्त झाले आहेत. प्रदीप बक्षी या मेहुण्याला हॉटशॉट्स अॅपचे मालक असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Raj Kundra: Mumbai police find 51 porn films from Raj Kundra; Public Prosecutor's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app