Raj Kundra Case : नग्न सीनआधी घेतली जात असे कॉन्ट्रॅक्टवर सही; अशा होत्या अटी, शर्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 09:38 PM2021-07-22T21:38:15+5:302021-07-22T21:39:31+5:30

Raj Kundra Case : याप्रकरणी आता तर पोर्नोग्राफी रॅकेटचा कॉन्ट्रॅक्ट कॉपी समोर आली आहे. 

Raj Kundra Case: Signing a contract taken before a nude scene; Such were the conditions, the bets | Raj Kundra Case : नग्न सीनआधी घेतली जात असे कॉन्ट्रॅक्टवर सही; अशा होत्या अटी, शर्थी

Raj Kundra Case : नग्न सीनआधी घेतली जात असे कॉन्ट्रॅक्टवर सही; अशा होत्या अटी, शर्थी

Next
ठळक मुद्देपोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात समोर आलेल्या या कॉन्ट्रॅक्ट कॉपीमध्ये असं नमूद केलंय की, मला आनंद होतोय की, माझी एक कलाकार म्हणून नवी वेब सीरिजसाठी (नाव) ………..१० हजार रूपयांच्या पॅकेजमध्ये निवड केली आहे

मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अटक करून मोठ्या पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर सिनेमासृष्टीत खळबळ उडाली असून अनेक वेगवेगळ्या अभिनेत्रींनी आरोप -प्रत्यारोप केले आहेत. दरदिवशी राज कुंद्राबाबत नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. याप्रकरणी आता तर पोर्नोग्राफी रॅकेटचा कॉन्ट्रॅक्ट कॉपी समोर आली आहे. 

‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, पोर्नोग्राफी रॅकेटच्या या कॉन्ट्रॅक्ट कॉपीच्या माध्यमातून राज कुंद्रा आणि त्याची टीम बॉलिवूडमध्ये स्ट्रगलर अभिनेत्रींना पैशाचं आमिष दाखवून साइन केलं जात होतं. या कॉन्ट्रॅक्ट कॉपीनुसार, कोणतेही बोल्ड, इंटीमेट, अश्लील आणि न्यूड सीन्स शूट करण्याआधी त्या अभिनेत्रींकडून सहमती गरजेची असते. यासाठी राज कुंद्रा आणि टीम या कॉन्ट्रॅक्ट कॉपीवर त्या संबंधित अभिनेत्रींना साइन करण्यासाठी सांगत होते.

पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात समोर आलेल्या या कॉन्ट्रॅक्ट कॉपीमध्ये असं नमूद केलंय की, मला आनंद होतोय की, माझी एक कलाकार म्हणून नवी वेब सीरिजसाठी (नाव) ………..१० हजार रूपयांच्या पॅकेजमध्ये निवड केली आहे. ही वेब सीरिज फ्लिज (Fliz) मूव्हीज या बॅनरखाली तयार करण्यात आली आहे आणि जगभरातील प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. चर्चेदरम्यान ठरलेल्या शूटिंगच्या तारखा……..या आहेत. माझ्या सहमतीने मी या चित्रपटात इंटीमेट, एरोटिक, बोल्ड सीन्स ज्यात लिप लॉक, स्मूच सीन्स, टॉपलेस यासारखे न्यूड सीन्स करत असल्याचे घोषित करत आहे.

यापुढे या कॉन्ट्रॅक्ट कॉपीमध्ये मी माझ्या स्वइच्छेने हे सीन्स करण्यासाठी तयार आहे. माझ्यावर प्रोडक्शन हाउसची कोणत्याही प्रकारची जोरजबरदस्ती किंवा दबाव नाही. मी घोषित करते की, जर प्रोडक्शन हाउसने माझे एरोटिक, बोल्ड, टॉपलेस, न्यूड सीन्सना कोणत्या चित्रपटात, वेबसाईट्स किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर वापरले तरी माझी काही हरकत नाही. मी याविरोधात कोणत्याही प्रकरचा आरोप करणार नाही. असे नमूद करण्यात आले आहे. पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा आणि त्याचा राईट हॅन्ड असलेला मुख्य आरोपी उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. असे म्हटले जाते की आरोपी उमेश कामत याने बनविलेले ७० व्हिडिओ गुन्हे शाखेने जप्त केले आहेत.

Web Title: Raj Kundra Case: Signing a contract taken before a nude scene; Such were the conditions, the bets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app