Raj Kundra Case : राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:57 PM2021-07-24T18:57:19+5:302021-07-24T18:59:09+5:30

Raj Kundra Case : बर्रा आणि कॅंट येथील बॅंकांमधील खात्यांमध्ये अनेकवेळा देवाण-घेवाण झाल्याचं दिसलं. शुक्रवारी मुंबई क्राइम ब्रॅंचच्या आदेशावरून ही खाती सीज करण्यात आली.

Raj Kundra Case : Raj Kundra money come in the bank account of two girls in Kanpur | Raj Kundra Case : राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज

Raj Kundra Case : राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज

Next

बिझनेसमॅन आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा(Raj Kundra) पॉर्न सिनेमाप्रकरणी अधिकच खोलात अडकत असल्याचं दिसत आहे. चौकशीतून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि पुरावे मिळत आहेत. अशात आता शनिवारी राज कुंद्राचं कानपूर कनेक्शन समोर आलं आहे. राज कुंद्राच्या कंपनीचा काही भाग कानपूरमधील दोन क्लाएंटच्या खात्यात जमा होत होता. बर्रा आणि कॅंट येथील बॅंकांमधील खात्यांमध्ये अनेकवेळा देवाण-घेवाण झाल्याचं दिसलं. शुक्रवारी मुंबई क्राइम ब्रॅंचच्या आदेशावरून ही खाती सीज करण्यात आली.

या खात्यांमध्ये २.३८ कोटी रूपये जमा आहेत. मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या ११ सहकाऱ्यांची १८ बॅंक खाती सीज केली आहेत. यात ७.३१ कोटी रूपये जमा आहे. यातील दोन खाती कानपूरमधील निघातील. यातील एक हर्षिता श्रीवास्तव नावाची महिला आहे आणि दुसरीचं नाव नर्बदा श्रीवास्तव आहे.  हर्षिताचं खातं बर्रा येतील पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेत आहे. या खात्यांमध्ये २ कोटी ३२ लाख ४५ हजार २२२ रूपये जमा आहेत. (हे पण वाचा : Raj Kundra Case: शिल्पा शेट्टीची पोर्नोग्राफी केसमध्ये पोलिसांनी केली ६ तास चौकशी, विचारले हे १० प्रश्न...)

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राच्या बॅंक अकाऊंटच्या चौकशीतून समोर आलं की, त्याने काही ऑनलाइन बेटींग केली आहे. पोलिसांना संशय आहे की, पॉर्न सिनेमातून कमावलेल्या पैशांचा वापर त्याने बेटिंगसाठी केला आहे. २१ जुलैला राज कुंद्राच्या अटकेनंतर बराच डेटा डिलीट करण्यात आला आहे. पोलीस तो डेटा रिकव्हर करण्याच्या प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, शिल्पा शेट्टीने पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, तिला पॉर्न अॅप आणि पॉर्न सिनेमाबाबत काहीच माहीत नाही. तिने दावा केला की, तिचा पती राज कुंद्रा निर्दोष आहे. ती म्हणाली की, दुसरे आरोपी पॉर्न बनवत असतील. लंडनमध्ये बसलेले राज कुंद्राचे नातेवाईक जे अॅपमध्ये व्हिडीओ टाकत होते, त्यांचा यात हात असू शकतो. शिल्पा म्हणाली की, तिचा पती अॅपसाठी व्हिडीओ बनवत होते, पण ते पॉर्न नव्हते.
 

Web Title: Raj Kundra Case : Raj Kundra money come in the bank account of two girls in Kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app