Raj Kundra Arrest: राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 15:14 IST2021-07-20T15:14:16+5:302021-07-20T15:14:47+5:30
Raj Kundra Arrest : या प्रकरणाचा तपासाचा एक भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली.

Raj Kundra Arrest: राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी व्यावसायिक, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळाली. या प्रकरणाचा तपासाचा एक भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली.
आज राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प (४३) या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर दहा आरोपी जामिनावर मुक्त आहेत.
अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी व्यावसायिक, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी pic.twitter.com/bEJEZ7vNog
— Lokmat (@MiLOKMAT) July 20, 2021
मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये हे रॅकेट उघड़कीस आणले होते. या कारवाईत यापूर्वी यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन दीपंकर खासनवीस (४०), प्रतिभा नलावडे (३३), मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी (३२), मोनू गोपालदास जोशी (२६), भानुसूर्यम ठाकुर (२६), वंदना रविंद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ (३२), उमेश कामत, दीपंकर खासनवीस (३८) यांना बेड्या ठोकल्या होत्या.