खळबळजनक! रेल्वे महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 18:59 IST2020-04-22T18:56:35+5:302020-04-22T18:59:03+5:30
याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

खळबळजनक! रेल्वे महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्दे सुरेखा बेराडे (२५) यांनी गोरेगावमधील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. पती प्रमोद (२५) हे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत.
मुंबई - अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुरेखा बेराडे (२५) यांनी गोरेगावमधील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्यांचे पती प्रमोद (२५) हे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांनी हे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक चौकशी करत आहेत.