रेल्वेच्या अधिकाऱ्याला ग्वाल्हेरमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 02:21 IST2020-10-31T02:21:29+5:302020-10-31T02:21:54+5:30
रेल्वेच्या सामानांचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली कंत्राटदाराची पावणेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी रेल्वेच्या सेक्शन इंजिनीअरला ग्वाल्हेरमधून शुक्रवारी अटक करण्यात आली.

रेल्वेच्या अधिकाऱ्याला ग्वाल्हेरमधून अटक
मुंबई : रेल्वेच्या सामानांचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली कंत्राटदाराची पावणेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी रेल्वेच्या सेक्शन इंजिनीअरला ग्वाल्हेरमधून शुक्रवारी अटक करण्यात आली. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे.
अनिलकुमार मखनलाल अहिवार (५२) असे अटक केलेल्या सेक्शन इंजिनीअरचे नाव आहे. तो महालक्ष्मी कारखान्यात वरिष्ठ अधिकारी आहे. आरोपींनी त्यांना भारतीय रेल्वेच्या दोन डब्यांना लिंकिंग करण्यासाठी लागणारे हॉर्स पाइपचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले.
पुढे तक्रारदाराला भारतीय रेल्वेचे बनावट लोगो, शिक्के, वॉटर मार्कचा वापर करून तयार केलेली बनावट खरेदी ऑर्डर दिली. यात माल देण्याकरिता १ कोटी ४४ लाख ९५ हजार घेतले. पुढे अजनी, नागपूर, भुसावळ येथे बोलावून चलनावर सह्या घेतल्या, मात्र माल दाखवला नाही. त्यानंतर पुन्हा टेंडर निघाल्याचे सांगून आणखी ७२ लाख रुपये उकळले.