शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

नागपुरातील धरमपेठच्या बहुचर्चित फ्युजन हुक्का पार्लरवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:35 PM

अंबाझरी पोलिसांनी धरमपेठच्या बहुचर्चित फ्युजन कॅफे अ‍ॅन्ड लाऊंजमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर धाड टाकून मालकासह तीन नागरिकांना अटक केली आहे.

ठळक मुद्देसहा दिवसातील तिसरी कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अंबाझरी पोलिसांनी धरमपेठच्या बहुचर्चित फ्युजन कॅफे अ‍ॅन्ड लाऊंजमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर धाड टाकून मालकासह तीन नागरिकांना अटक केली आहे.धरमपेठ एक्स्टेन्शनमध्ये फ्युजन कॅफे अ‍ॅन्ड लाऊंज आहे. अंबाझरी पोलिसांना येथे हर्बलच्या आड प्रतिबंधित हुक्का चालविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गुरुवारी रात्री लाऊंजमध्ये धाड टाकली. पोलिसांना एका युवतीसह सात ग्राहक हुक्का पिताना मिळाले. पोलिसांनी तपास केला असता ग्राहकांनी प्रतिबंधित हुक्काचे सेवन केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हुक्क्याच्या पॉटसह ५२०० रुपयांचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी लाऊंजचा मालक मयंक अग्रवाल, व्यवस्थापक प्रतीक उके तसेच दीपेन ऊर्फ रोमी नाईकविरुद्ध कोप्टा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सूत्रांनुसार फ्युजन लाऊंज अनेक दिवसापासून सुरु आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगाही या लाऊंजशी निगडित असल्याची चर्चा आहे. त्याने अनेकदा धरमपेठ परिसरात हंगामा केला आहे. अंबाझरी ठाण्याचा परिसर हुक्का पार्लरच्या बाबतीत चर्चेत आहे. सहा दिवसामधील ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने दोनवेळा कारवाई केली आहे. ही कारवाई निरीक्षक करे, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद घोडके, सहायक उपनिरीक्षक आशिष कोहळे, संतोष वानखेडे, श्रीकांत उईके, योगेश काटरपवार यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडNagpur Policeनागपूर पोलीस