नागपुरातील धरमपेठच्या बहुचर्चित फ्युजन हुक्का पार्लरवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 23:37 IST2020-01-31T23:35:22+5:302020-01-31T23:37:12+5:30
अंबाझरी पोलिसांनी धरमपेठच्या बहुचर्चित फ्युजन कॅफे अॅन्ड लाऊंजमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर धाड टाकून मालकासह तीन नागरिकांना अटक केली आहे.

नागपुरातील धरमपेठच्या बहुचर्चित फ्युजन हुक्का पार्लरवर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी पोलिसांनी धरमपेठच्या बहुचर्चित फ्युजन कॅफे अॅन्ड लाऊंजमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर धाड टाकून मालकासह तीन नागरिकांना अटक केली आहे.
धरमपेठ एक्स्टेन्शनमध्ये फ्युजन कॅफे अॅन्ड लाऊंज आहे. अंबाझरी पोलिसांना येथे हर्बलच्या आड प्रतिबंधित हुक्का चालविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गुरुवारी रात्री लाऊंजमध्ये धाड टाकली. पोलिसांना एका युवतीसह सात ग्राहक हुक्का पिताना मिळाले. पोलिसांनी तपास केला असता ग्राहकांनी प्रतिबंधित हुक्काचे सेवन केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हुक्क्याच्या पॉटसह ५२०० रुपयांचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी लाऊंजचा मालक मयंक अग्रवाल, व्यवस्थापक प्रतीक उके तसेच दीपेन ऊर्फ रोमी नाईकविरुद्ध कोप्टा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सूत्रांनुसार फ्युजन लाऊंज अनेक दिवसापासून सुरु आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगाही या लाऊंजशी निगडित असल्याची चर्चा आहे. त्याने अनेकदा धरमपेठ परिसरात हंगामा केला आहे. अंबाझरी ठाण्याचा परिसर हुक्का पार्लरच्या बाबतीत चर्चेत आहे. सहा दिवसामधील ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने दोनवेळा कारवाई केली आहे. ही कारवाई निरीक्षक करे, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद घोडके, सहायक उपनिरीक्षक आशिष कोहळे, संतोष वानखेडे, श्रीकांत उईके, योगेश काटरपवार यांनी केली.