शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ऑर्केस्ट्रा बारवरील छाप्यात हाती लागले केवळ ५४० रुपये, पोलिसांंवर भरोसा ठेवायचा कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 11:10 AM

Crime News: ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणारा बारबालांचा अश्लील नाच आणि त्यावर मद्यपींकडून केली जाणारी नोटांची उधळण, अशी सर्वसाधारण स्थिती असताना, मीरा रोडच्या एका ऑर्केस्ट्रा बारवरील छाप्यात मात्र पोलिसांना केवळ २० रुपयांच्या २७ नोटाच सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मीरा रोड : ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणारा बारबालांचा अश्लील नाच आणि त्यावर मद्यपींकडून केली जाणारी नोटांची उधळण, अशी सर्वसाधारण स्थिती असताना, मीरा रोडच्या एका ऑर्केस्ट्रा बारवरील छाप्यात मात्र पोलिसांना केवळ २० रुपयांच्या २७ नोटाच सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या धाडीत ५४० रुपयांची रक्कम जप्त करून बार कर्मचारी व बारबालांसह १५ जणांना पकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात जुजबी कलमे लावल्याचे आरोप होत आहेत. अमली पदार्थविरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे, सहायक निरीक्षक कुटे व पथकाने २९ नोव्हेंबरच्या रात्री मीरा रोडच्या शीतलनगरमधील यश ९ या ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला. त्यावेळी मंद प्रकाशात चार महिला तोकडे कपडे घालून गाण्याच्या तालावर अश्लील हावभाव करून मद्यपान करीत असलेल्या पुरुषांच्या आजूबाजूला नृत्य करून पुरुष ग्राहकांना उत्तेजित करीत होत्या. बारच्या गल्ल्याची झडती घेता, त्यात २० रुपये किमतीच्या २७ नोटा असे ५४० रुपये मिळून आले. गायिकेच्या नावाखाली अश्लील नाच करणाऱ्या बारबाला, एक व्यवस्थापक, एक रोखपाल, सहा वेटर आणि तीन पुरुष गायक-वादक अशा १५ जणांना बारमधून पकडण्यात आले.३० नोव्हेंबर रोजी तेजश्री यांनी दिलेल्या फिर्यादीत हा प्रकार नमूद असून मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्या १५ जणांसह बारचा चालक व मालक अशा एकूण १७ जणांना आरोपी केलेले आहे. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करताना जुजबी कलमे लावली आहेत. महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण आदी कायद्याची कलमे लावलेली नाहीत. इतक्या मोठ्या ऑर्केस्ट्रा बारमधून केवळ ५४० रुपयेच पोलिसांना सापडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारवाईबाबत सामान्यांनी संशय व्यक्त केला आहे.

nऑर्केस्ट्रा बारमध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दोन हजार वा ५०० च्या नोटांचे सुटे म्हणून १०, २० आदी रुपयांच्या कडक कोऱ्या करकरीत नोटा दिल्या जातात. कारण या नोटा नाचणाऱ्या बारबालांवर उधळल्या जातात. त्यांचे हारसुद्धा असतात.n त्यामुळे बारमधून केवळ ५४० रुपयांची रोकड आणि त्याही फक्त २० रुपयांच्या नोटा सापडल्याने पोलिसांच्या या धाडीवर किती भरोसा ठेवायचा, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोड