माजी नगरपालिका सभापतीच्या मटका अड्ड्यावर धाड, चिठ्ठ्या-मोबाईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 12:41 IST2022-01-25T12:40:19+5:302022-01-25T12:41:08+5:30
यावेळी दोन लाख रुपयांच्या मुद्देमालासह मटक्याच्या चिठ्ठ्या व इतर साहित्य जप्त केले.

माजी नगरपालिका सभापतीच्या मटका अड्ड्यावर धाड, चिठ्ठ्या-मोबाईल जप्त
बीड : शहरातील कबाडगल्लीत एका वाड्यात राजरोस सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने २४ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा टाकला. माजी पालिका सभापती बाळासाहेब जगन्नाथ जाधव यांच्या इशाऱ्यावर हा अड्डा चालत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
यावेळी दोन लाख रुपयांच्या मुद्देमालासह मटक्याच्या चिठ्ठ्या व इतर साहित्य जप्त केले. एका आरोपीला ताब्यात घेतले असून, उर्वरित फरार झाले. सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह शिवाजीनगर ठाण्याच्या डी. बी. पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक बाळराजे दराडे, रवींद्र आघाव, सचिन आगलावे, हवालदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, रामहरी भांडणे, सचिन अहंकारे, दीपक जावळे, राजू वंजारे, बाळासाहेब सिरसाट, अविनाश सानप, मनोज परजणे, सय्यद आशपाक यांनी ही कारवाई केली.