हिंगणघाटात फार्महाऊसवरील जुगाअड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 22:44 IST2020-08-27T22:43:54+5:302020-08-27T22:44:02+5:30

याप्रकरणी पोलिसांनी १६ जुगाºयांना अटक केली असून दोन पोलीस कर्मचारी तेथून फरार होण्यात यशस्वी झाले.

Raid on Jugaadda on Farmhouse in Hinganghat | हिंगणघाटात फार्महाऊसवरील जुगाअड्ड्यावर छापा

हिंगणघाटात फार्महाऊसवरील जुगाअड्ड्यावर छापा

हिंगणघाट : शेतातील फार्महाऊसवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगणघाट पोलिसांनी छापा मारला. जुगार खेळणाºयांमध्ये भाजपचे समुद्रपूर तालुक्याचे अध्यक्ष तसेच स्विकृत नगरसेवकांसह प्रतिष्ठित नागरिकांसह पोलीस कर्मचाºयांचाही समावेश होता.  

याप्रकरणी पोलिसांनी १६ जुगाºयांना अटक केली असून दोन पोलीस कर्मचारी तेथून फरार होण्यात यशस्वी झाले. नंदोरी रस्त्यावरील पारले गोदामाजवळ असलेल्या एका शेतातील फार्महाऊसवर ही कारवाई करण्यात आली.  जुगाºयांकडून तब्बल पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Raid on Jugaadda on Farmhouse in Hinganghat

टॅग्स :Policeपोलिस