नागपुरातील मनीषनगरात हुक्का पार्लरवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 00:28 IST2020-07-07T00:26:52+5:302020-07-07T00:28:06+5:30
मनीषनगरातील एका हुक्का पार्लरवर बेलतरोडी पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून एका तरुणीसह पाच जणांना ताब्यात घेतले. न्यू मनीषनगरातील प्रभा विहार अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत हे हुक्का पार्लर सुरू होते.

नागपुरातील मनीषनगरात हुक्का पार्लरवर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनीषनगरातील एका हुक्का पार्लरवर बेलतरोडी पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून एका तरुणीसह पाच जणांना ताब्यात घेतले. न्यू मनीषनगरातील प्रभा विहार अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत हे हुक्का पार्लर सुरू होते. रविवारी दुपारी ठाणेदार विजय आकोत यांना ही माहिती कळली. त्यांनी शहानिशा करून घेतल्यानंतर सहकाऱ्यांना या हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी रात्री ७ च्या सुमारास तेथे पोलिसांनी छापा घातला. यावेळी पोलिसांना आमिर सिद्धिकी, मोहित कोठारी, यश मानकर, शृतेश मानकर आणि आयुषी वानखेडे हे पाच जण हुक्का पिताना आढळले. पोलिसांनी तेथून विविध तंबाखूजन्य पदार्थासह ९,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त विजय मराठे, वरिष्ठ निरीक्षक विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साळुंखे, उपनिरीक्षक मनपिया, हवालदार तेजराम देवळे, रणधीर दीक्षित, नायक गोपाल देशमुख, बजरंग जुनघरे, शिपाई नितीन बावणे, कुणाल लांडगे आणि वर्षा भाग्यश्री यांनी ही कामगिरी बजावली.