राधिका यादव हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले तिचे वडील दीपक यादव यांची पोलीस सतत चौकशी करत आहेत. त्यांना आता १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या या भयानक घटनेनंतर राधिकाच्या कुटुंबासह संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेले दीपक यांचा मोठा भाऊ म्हणजेच राधिकाचे काका विजय यादव यांनी 'आजतक'शी बोलताना धक्कादायक खुलासा केला आहे.
विजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गोळ्यांचा आवाज ऐकताच वरच्या मजल्यावर धावत आलो. दीपक तिथेच बसला होता, रडत होता आणि म्हणाला - "भाऊ, मी मुलीचा वध केला आहे, मला फाशी द्या." दीपक रडत होता. तो खूप दुःखी होता. मला भीती वाटत होती की, तो स्वतःलाही गोळी मारेल. त्याने काहीही चुकीचं करू नये असं मला वाटत होतं." त्यानंतर विजय यांनी ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती दिली.
"इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान दीपक यादव यांनी कबूल केलं की, ते नैराश्यात होते. मुलीमुळे त्यांना लोकांचे टोमणे सहन करावे लागत होते. तसेच राधिकाच्या टेनिस अकॅडमीलाही त्यांचा विरोध होता. त्यांनी तिला ती अकॅडमी बंद करण्यास सांगितली होती. राधिका गेल्या वर्षी एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती, ज्यावरून घरात वाद झाले होते.
राधिकाच्या करियरवर अडीच कोटींचा खर्च, अकाऊंट डिलीट; वडिलांच्या थ्येरीवर पोलिसांना संशय
राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासात पुन्हा नवा ट्विस्ट समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिकाचे वडील दीपक यादव यांनी स्वतःच्या मुलीवर गोळी झाडली होती, तसेच घटनेपूर्वी त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. दीपक काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावी वजीरबादला गेले होते, जिथे गावकऱ्यांनी त्यांना टोमणे मारले.