मित्राकडून कामगाराचा डोक्यात दगड घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:49 IST2019-02-06T01:48:51+5:302019-02-06T01:49:18+5:30

भाजी आणण्यासाठी कोणी पैसे द्यायचे, या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्याची घटना उघड झाली आहे.

 Put a stone on a worker's head and kill a friend | मित्राकडून कामगाराचा डोक्यात दगड घालून खून

मित्राकडून कामगाराचा डोक्यात दगड घालून खून

न-हे  -  भाजी आणण्यासाठी कोणी पैसे द्यायचे, या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्याची घटना उघड झाली आहे़
किरण काटकर (वय २८, रा़ येवलेवाडी ता़ हवेली) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे़ नºहे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील स्वराज डेव्हलपर्स बांधकाम साइटवरील पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान घडली़
याप्रकरणी आत्माराम महादेव जाधव (वय ४९, रा़ बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली असून पप्पू पाटील (वय २८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
किरण काटकर आणि पप्पू पाटील हे दोघे एकमेकांचे मित्र होते़ ते बांधकाम साइटवरील पत्र्याच्या शेडमध्ये एकत्र रहात होते़ सोमवारी त्यांच्यात भाजी आणण्यासाठी पैसे कोण देणार, यावरून भांडणे झाली होती़ काटकर याने आत्माराम जाधव यांना बोलावून घेतले़ तेव्हा त्यांनी १०० रुपये दिले व चिकन आणण्यास सांगितले़ मात्र, पप्पू पाटील हा चिकनऐवजी अंडी घेऊन आला़ त्यावरून रागाच्या भरात काटकर याने पप्पूला मारले़ तेव्हा त्याने बघून घेण्याची धमकी दिली़ त्यानंतर तिघेही न जेवता झोपी गेले़ जाधव हे सकाळी सहा वाजता उठून प्रात:विधीसाठी बाहेर गेले असताना पप्पू पाटील याने झोपलेल्या काटकर याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला व तो पळून गेला़
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संगीता यादव, आदींनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप हे करीत आहेत.

आमच्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये तीन तरुण राहत होते. त्यामधील दोघांमध्ये दारू पिऊन रात्रभर कडाक्याची भांडणे चालू असल्याचा आवाज आम्हाला येत होता. मात्र, सकाळी त्यातील एक जण प्रात:विधीसाठी जाऊन परत येईपर्यंत हा प्रकार घडला.
- संगीता वाघमारे,
शेजारी राहणाऱ्या
सुरक्षारक्षकाची पत्नी

Web Title:  Put a stone on a worker's head and kill a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.