शिवी दिली म्हणून पुलावरून दिले ढकलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 04:57 IST2020-11-07T04:57:39+5:302020-11-07T04:57:56+5:30

Crime : शिवी दिल्याच्या रागात दिल्ली येथील बँकेत उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या महिलेच्या पतीचे अपहरण करत, त्याला दारू पाजून मारहाण केली.

Pushing from the bridge as swearing | शिवी दिली म्हणून पुलावरून दिले ढकलून

शिवी दिली म्हणून पुलावरून दिले ढकलून

मुंबई : शिवी दिल्याच्या रागात दिल्ली येथील बँकेत उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या महिलेच्या पतीचे अपहरण करत, त्याला दारू पाजून मारहाण केली. पुढे कळवा खाडीवरील पुलावरून ढकलून दिल्याचा प्रकार गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने दोघांना संगमनेर येथून शुक्रवारी अटक केली.
तक्रारदार दिल्लीतील बँकेत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्या सुट्टीनिमित्त मुंबईत गोराई परिसरात पती आणि सासूसोबत राहतात. ३ नोव्हेंबर रोजी त्यांचे पती इमारतीखाली गप्पा मारत असताना बेपत्त्ता झालेे. सुरक्षारक्षकाने त्यांना काही जण जबरदस्तीने रिक्षात बसवून घेऊन गेल्याचे सांगितले. 
प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या पथकाने तपासाअंती संगमनेरहून दिनेश सूरजसिंह मेहरा (४६) आणि महेश सूर्यकांत कुटे (२९) यांना अटक केली. आरोपी, अपहृत एकमेकांना ओळखत हाेते. ते सोबत नशा करायचे. पाच वर्षांपूर्वी आरोपींनी अपहृत व्यक्तीला मारहाण केली होती.  या रागातून ३ नाेव्हेंबरला आराेपीने त्यांना शिविगाळ केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समाेर आले. तक्रारदार महिलेच्या पतीचा शाेध सुरू आहे.

Web Title: Pushing from the bridge as swearing