विधवा महिलेसोबत दुष्कर्म करताना पोलीस अधिकाऱ्याला लोकांनी रंगेहाथ पकडलं, व्हिडीओ केला व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 15:39 IST2021-05-12T15:39:15+5:302021-05-12T15:39:27+5:30
एएसआयने पीडित महिलेच्या मुलावर नशा तस्करीची केस लावली होती. यानंतर महिलेची मदत करण्याच्या बदल्यात एएसआय दुष्कर्म करत होता.

विधवा महिलेसोबत दुष्कर्म करताना पोलीस अधिकाऱ्याला लोकांनी रंगेहाथ पकडलं, व्हिडीओ केला व्हायरल...
पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यात सीआयए स्टाफच्या एएसआयला गावातील लोकांनी एका विधवा महिलेसोबत दुष्कर्म करताना रंगेहाथ पकडलं आहे. आरोपी गुरिंदर सिंह लोकांना पाहून तोंड लपवत रडायला लागला होता. तेच लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून इंटरनेटवर व्हायरल केला आहे. असे सांगितले जात आहे की, एएसआयने पीडित महिलेच्या मुलावर नशा तस्करीची केस लावली होती. यानंतर महिलेची मदत करण्याच्या बदल्यात एएसआय दुष्कर्म करत होता.
मंगळवारी रात्री जेव्हा ASI महिलेच्या घरी पोहोचला तेव्हा गावातील लोकांनी त्याला रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. याप्रकरणी एसएसपी भूपेंद्र सिंह विर्क यांनी सांगितले की, आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नोकरीहून काढण्याची विनंती विभागाला पाठवण्यात आली आहे.
दरम्यान याआधी पंजाबच्या एका पोलीस अधिकाऱ्याने भाजीवाल्याच्या टोपलीला लाथ मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत गाडीतून उतरून पोलीस अधिकारी भाजीवाल्याच्या टोपलीला लात मारताना दिसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर टीका झाली होती. त्यानंतर एसएचओला निलंबित करण्यात आलं होतं. सोशल मीडियातून या अधिकाऱ्यावर मोठी टीका झाली होती. त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित करावं लागलं होतं.