एक महिलेचे 15 पती; सगळे पंजाबमधून इंग्लंडला पोहोचले, नंतर या प्रकरणात आला नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:47 IST2025-09-05T16:46:39+5:302025-09-05T16:47:01+5:30
Punjab Crime: या प्रकरणातील ट्विस्ट पाहून पोलिसही चक्रावले.

एक महिलेचे 15 पती; सगळे पंजाबमधून इंग्लंडला पोहोचले, नंतर या प्रकरणात आला नवा ट्विस्ट
Punjab Crime: पंजाबमधून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीला इंग्लंडमध्ये राहणाऱ्या पत्नीला भेटायला जायचे होते. त्याने इंग्लडच्या व्हिसासाठी अर्ज केला, पण त्याचा व्हिसा झाला नाही. नंतर त्याला कळले की, त्याच्या पत्नीचे आणखी १५ पती आहेत. हे जाणून त्याला जबर धक्का बसला. नंतर सत्य समोर आल्याने पोलिसही चक्रावले. तपासात आढळले की, महिलेला १५ पती नाहीत, तर तिच्या ओळखपत्राचा गैरवापर करुन १५ तरुणांना इंग्लंडला पाठवण्यात आले आहे.
ही फसवणूक एका जोडप्याने केली होती. पोलिसांनी त्या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, इंग्लंडमध्ये राहणाऱ्या त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मात्र, तिचा या संपूर्ण प्रकरणाशी संबंध नसल्याचे तपासात समोर आले. आल्या ओळखपत्राचा गैरवापर केल्याचे त्या महिलेला माहिती नव्हते. महिलेचा खरा पती पंजाबमधील राजपुरा येथे राहतो.
इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या जोडप्याने महिलेच्या कागदपत्रांचा गैरवापर केला आणि १५ तरुणांना त्या महिलेचा पती सांगून इंग्लंडला पाठवले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या प्रशांत आणि त्याची पत्नी रुबीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करुन कारवाई सुरू केली आहे.