शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आयपीएल सट्ट्यावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींना अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 23:33 IST

Crime News : गणेश भूतडा हा देशातील मोठा क्रिकेट बुकी असून अशोक जैन हा ही मोठा बुकी आहे. आयपीएलमध्ये रविवारी दोन्ही मोठे सामने होते.

पुणे : पुणे शहर पोलिसांनी रविवारी रात्री आयपीएलवर सट्टा खेळणार्या दोन ठिकाणी एकाच वेळी मोठी कारवाई करत दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुक्कींसह अनेकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ९३ लाख रूपयांवर अधिकची रोकड जप्त केली आहे. या कारवाई दरम्यान, सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक जैन या दोघांसह काही जणांना ताब्यात घेतले आहे. 

समर्थ व मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार पेठेतील एका ठिकाणी छापा टाकून टाकून गणेश भुतडा याला अटक करुन तेथून ९२ लाख ६५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर मार्केट यार्ड येथून अशोक जैन या बुकीला अटक करण्यात आली. तेथून ५१ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून अजूनही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती.

गणेश भूतडा हा देशातील मोठा क्रिकेट बुकी असून अशोक जैन हा ही मोठा बुकी आहे. आयपीएलमध्ये रविवारी दोन्ही मोठे सामने होते. त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

त्यानुसार, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेच्या प्रभारी अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी एकाच वेळी ही कारवाई केली.गणेश भुतडा आणि अशोक जैन यांच्याकडील डायऱ्या, मोबाईल आणि इतर काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यात या सट्ट्याच्या व्यवहाराची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIPLआयपीएल २०२१