पुंडलिक महाराज थेटे यांना राज ठाकरेंचे नाव सांगत जीवे मारण्याची धमकी
By अण्णा नवथर | Updated: July 3, 2024 18:36 IST2024-07-03T18:36:41+5:302024-07-03T18:36:51+5:30
ही घटना मंगळवारी (दि.२) दुपारी एक वाजेच्या सुमारास शेंडी ( ता. नगर ) येथील दत्त मंदिरात दिंडी थांबली असताना घडली.

पुंडलिक महाराज थेटे यांना राज ठाकरेंचे नाव सांगत जीवे मारण्याची धमकी
अहमदनगर: तुम्हाला आमच्या राज ठाकरे साहेबांची एलर्जी आहे का, असे म्हणत त्रिंबकेश्वर येथील संत निवृत्ती नाथ पालखी सोहळ्याचे सदस्य हभप पुंडलिक महाराज थेटे यांना जीवे ठार माण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२) दुपारी एक वाजेच्या सुमारास शेंडी ( ता. नगर ) येथील दत्त मंदिरात दिंडी थांबली असताना घडली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हभप पुंडलिक महाराज थेटे यांनी फिर्याद दिली आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी मंगळवारी अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या शेंडीगावात पोहोचली. त्यावेळी थेटे महाराज यांना फोन आला. त्यांनी तो उचलला नाही.
काहीवेळाने त्याच नंबरवरून पुन्हा फोन आला. त्यांनी फोन उचलला असता तुम्हाला आमच्या राज साहेब ठाकरे यांची एलर्जी आहे का तुम्ही अत्ता कुठे आहात. तुमचे लोकेशन पाठवा. तुमच्या तोंडाला अहमदनगरमधील कार्यकर्ते काळे फासतील, असा दम दिला. तसेच तुम्हाला जर हे संकट टाळायचे असेल तर मला एक लाख रुपये द्या नाही, तर जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर फोन कट झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.