संजय बियाणींच्या हत्येतील पल्सर जाळली? हत्येचं गुढ आणखी वाढलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 08:24 IST2022-04-16T08:24:22+5:302022-04-16T08:24:48+5:30

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कहाळा बु. परिसरात एका निर्जन ठिकाणी पल्सर कंपनीची दुचाकी जळालेल्या अवस्थेत आढळून आली.

Pulsar bike used in Sanjay Biyani murder burnt | संजय बियाणींच्या हत्येतील पल्सर जाळली? हत्येचं गुढ आणखी वाढलं!

संजय बियाणींच्या हत्येतील पल्सर जाळली? हत्येचं गुढ आणखी वाढलं!

नांदेड :

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कहाळा बु. परिसरात एका निर्जन ठिकाणी पल्सर कंपनीची दुचाकी जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बियाणींच्या हत्येमध्येही आरोपींनी पल्सर कंपनीच्या दुचाकीचा वापर केला होता. त्यामुळे ही दुचाकी त्याच गुन्ह्यातील आहे काय? अशी चर्चा या परिसरात सुरू होती. पोलिसांनी पंचनामा करून जळालेली दुचाकी ताब्यात घेतली. 

कहाळा बु. परिसरातील मुंडकर शरफोद्दीन यांच्या शेतातील पडीक असलेल्या खड्ड्यामध्ये पल्सर दुचाकी जाळण्यात आली होती. मुंडकर शरफोद्दीन यांचा मुलगा शेतात गेला असता ही बाब त्याच्या लक्षात आली. याबाबत पोलिसांना माहिती दिली.

Web Title: Pulsar bike used in Sanjay Biyani murder burnt