शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पब्जी गेमच्या व्यसनापायी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 23:06 IST

तरुणाने मोबाईलचे चार्जर मिळत नसल्याने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

कल्याण - सध्या पब्जी या ऑनलाईन गेमच्या व्यसन बऱ्याच तरुणांमध्ये आहेत. कल्याणमध्ये पब्जीचे व्यसन असलेल्या तरुणाने मोबाईलचे चार्जर मिळत नसल्याने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रजनीश राजभर (27) असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून त्याने केलेल्या हल्ल्यात ओम भवडनाकर (32) जखमी झाले आहेत. रजनीशला पब्जी खेळण्याचे व्यसन होते. 7 फेब्रुवारीला दुपारी रजनीश पब्जी खेळत असताना त्याच्या मोबाईलची बॅटरी उतरली. तो फोन चार्जिंगला लावायला गेला असता त्याला चार्जरची केबल कापलेली असल्याचे दिसले. त्यामुळे तो फोन चार्ज करू शकत नव्हता. त्यावेळी त्याची बहिणी व तिचा होणारा नवरा ओम हे घरात होते. रजनीशने चार्जरविषयी बहिणीकडे विचारणा केली व तिनेच चार्जरची वायर कापल्याचा आरोप त्याने तिच्यावर केला. परंतु आपल्याला याबाबत काहीच माहीत नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर रागाच्या भरात रजनीशने बहिणीच्या लॅपटॉपची वायर कापली. त्यावरून त्यांच्यातील वाद पेटला. त्यामुळे ओमने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेला रजनीश शांत होत नसल्याने ओमने त्याला पब्जीच्या व्यसनावरून हटकले. त्यावरून रजनीश आणखीनच भडकला व त्याने ओमच्या पोटात सुरा खुपसला. त्यानंतर ओमला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारानंतर ओमला डिस्चार्ज मिळाला असून याप्रकरणी त्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी रजनीश विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसkalyanकल्याण